लवकरच नवीन वर्ष सुरू होणार आहे. त्यातच येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच २०२५ मध्ये अनेक ग्रह आपल्या राशी बदलतील. सन २०२५ मध्ये शनि, राहू आणि केतू आणि गुरु आपली राशी बदलणार आहेत. ज्योतिषीय गणनेनुसार, २०२५ मध्ये १८ तारखेला राहू कुंभ राशीत प्रवेश करेल तर त्याच तारखेला केतू सिंह राशीत प्रवेश करेल. २०२५ मध्ये ग्रहांची बदलती चाल काही राशीच्या लोकांसाठी खूपच शुभदायी राहील.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी २०२५ हे वर्ष खूप शुभ राहील. सर्व ग्रह मिळून या राशीच्या लोकांचे भाग्य उजळतील. नोकरीत पदोन्नती मिळू शकते. आदर वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. व्यवसायात तुम्हाला मोठा नफा मिळेल.
कर्क
२०२५ मध्ये होणारे राहू-केत परिवर्तन कर्क राशीच्या लोकांसाठी खूप शुभ मानले जाते. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आरोग्य चांगले राहील. २०२५ मध्ये प्रत्येक कामात यश मिळेल. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात.
वृषभ
मित्र आणि कुटुंबियांशी संबंध दृढ होतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी काळ चांगला राहील. वृषभ राशीच्या लोकांसाठी २०२५ मध्ये शनि, राहू-केतू आणि गुरूचे राशी परिवर्तन खूप खास असेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील.