रस्त्यांवरील खड्डे मनपा निधीतून नव्हे तर मक्तेदारांकडून बुजवा , कोणी केली मागणी

जळगाव : शहरातील खड्डे मनपानिधी खर्चातून न बुजविता रस्ते तयार करणाऱ्या मक्तेदाराकडून बुजवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) जळगाव महानगर (जिल्हा)तर्फे करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन मनपा आयुक्तांना मंगळवार,३० जुलैरोजी देण्यात आले.

निवेदनाचा आशय असा की,जळगाव शहरात केंद्र शासन, राज्य शासन व मनपा निधीतून काही ठिकाणी अल्प प्रमाणात सिमेंट व डांबरी रस्ते हे सार्वजनिक बांधकाम व मनपातर्फे टेंडर (निवीदा) मॅनेज करुन मर्जीतील मक्तेदारांना देण्यात आले आहेत. सिमेंट रस्ते व डांबरी रस्ते एक ते दिड वर्षात तर काही रस्ते हे फक्त सहा महिने व तीन महिन्यातच उखडले गेले. काही रस्त्यांना खड्डे, काही रस्त्यांना मोठ मोठे तडे गेलेले आहेत. त्यातील काही सिमेंट रस्ते हे डांबर टाकून दुरुस्त करण्यात आलेत, तर काही डांबरी रस्ते सिमेंट टाकून, काही ठिकाणी जाड रेती व जाड वेस्ट मटेरीयल टाकून करण्यात आले आहे.

शहरातील अशा रस्त्यांच्या बाबतीत आम्ही वेगवेगळ्या पक्षांनी व शहरातील नागरिकांनी रस्त्यांची निकृष्ट कामे झाल्याच्या तक्रारी या महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केलेल्या आहेत. जळगाव शहरातील काही दिवसांपूर्वी तयार करण्यात आलेले रस्ते बुजविण्यासाठी 30 जुलै रोजा मनपा निधीतून टेंडर काढून दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्या खड्ड्यात सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते स्वीय सहाय्यक फक्त मुरुम किंवा बांधकाम वेस्ट मटेरीयल टाकून गेल्या ५ ते ६ वर्षापासून करीत असून शहरातील मनपा आयुक्त जळगावकर नागरिकांनी भरलेल्या कराचा दुरुपयोग व मर्जीतील ठेकेदार व कार्यकर्त्यांचे पोट भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेले रस्ते, पुल, गटारी व तत्सम कामाच्या दुरुस्तीची जबाबदारी हे ५ ते १० वर्षापर्यंत त्या मक्तेदाराची असते अशी निवीदेतच प्रमुख अट असताना जळगाव शहरात करण्यात आलेल्या कामाच्या दुरुस्तीची जबाबदारी ही मक्तेदाराची असताना त्यावर वेगळा निधी खर्च करण्याचे प्रयोजन काय ? याकरिता शहरातील रस्ते दुरुस्ती नावाखाली उधळपट्टी करण्यात येणाऱ्या मनपा निधीचा दुरुपयोग थांबवावा अशी मागणी या निवेदनामार्फत करण्यात आली आहे. निवेदनावर महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, सरचिटणीस सुनील माळी, किरण राजपूत, संग्रामसिंग सूर्यवंशी, सुहास चौधरी, रहिम तडवी, नामदेवराव वाघ, मतीन सय्यद