जळगाव । जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाचे अपडेट आहे. रेशन प्रणाली अधिक पारदर्शक करण्यासाठी, प्रशासनाने मोबाइल क्रमांक रेशन कार्डशी जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे लाभार्थ्यांना वेळेवर धान्यसाठ्याची माहिती एसएमएसद्वारे मिळणार आहे. प्रत्येक लाभार्थ्याने मोबाइल क्रमांक संलग्न करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या सुविधेचे फायदे
पारदर्शकता: लाभार्थ्यांना त्यांचा हक्काचा साठा मिळाल्याची पुष्टी होईल.
तक्रारी होतील कमी: रेशन दुकानदारांकडून होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा बसेल.
त्वरित माहिती: धान्य साठा पोहोचल्यावर किंवा खरेदी झाल्यावर एसएमएस येईल.
सोय: कुटुंबातील कोणत्या सदस्याने धान्य घेतले, याचीही माहिती मिळेल.
नोंदणीसाठी आवश्यक प्रक्रिया
लाभार्थ्यांनी रेशन दुकानावर जाऊन आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांक द्यावा.
ही प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असेल.
स्थिती : जळगाव जिल्ह्यातील सहा लाखांवर लाभार्थ्यांनी आधीच मोबाइल क्रमांक नोंदणी केली आहे. अजूनही ज्यांनी नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे.