मुंबई : २०२४ मध्ये भारताने लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांना तोंड देण्यात लक्षणीय प्रगती केली आहे. आयोडिन हे एक महत्त्वाचे मायक्रोन्युट्रियंट असून थायरॉइडच्या समस्येवर महत्त्वाची भूमिका बजावते. आयोडिनच्या कमतरतेमुळे आयोडिन डेफिशियन्सी डिसऑर्डरचा त्रास होऊ शकतो. वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांना विशेषतः लहान मुले व गरोदर स्त्रियांना या डिसऑर्डरचा त्रास होऊन त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.
आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारा सर्वात गंभीर त्रास म्हणजे हायपोथायरॉइडिझम, ज्यामध्ये थायरॉइड पुरेसे हार्मोन्स तयार करण्यात अपयशी ठरतं. जर या आजारावर उपचार केले गेले नाही, तर ते जीवावर बेतू शकतं. यात थकवा, वजन वाढ, कोरडी त्वचा, थंडी वाजणे, अशी लक्षणे दिसतात. गरोदर स्त्रियांना आयोडिनच्या कमतरते मुळे मूल जन्मतः मृत असणे, गर्भपात होणे, पोटातल्या बाळाचा विकास नीट न होणे, मतिमंदत्व अशा समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
१९८३ पासून टाटा सॉल्ट भारतातील आयोडिन कम तरतेच्या समस्येला तोंड देण्यात आघाडीवर आहे. व्हॅक्यूम- इव्हॅपोरेटेड आयोडिनयुक्त मीठ उपलब्ध करणारा पहिला ब्रँड या नात्याने टाटा सॉल्ट लाखो भारतीयांच्या घराघरात पोहोचले आहे. टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या पॅकेज्ड फुड्स विभागाच्या अध्यक्षा दीपिका भान म्हणाल्या, ‘टाटा सॉल्ट गेल्या कित्येक वर्षांपासून आयोडिन कमतरतेच्या समस्येचे निवारण करण्यासाठी आयोडिनचे योग्य प्रमाण असलेले मीठ पुरवण्यासाठी बांधील आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून आमचा ब्रँड लाखो भारतीयांचे स्वास्थ्य जपण्यासाठी दर्जेदार उत्पादने पुरवत आहे.
इंडिया आयोडिन सर्व्हे २०१८-१९ नुसार टाटा सॉल्टने आयोडिन डेफिशियन्सी डिसऑर्डरचे प्रमाण कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांमधील २१,४०६ घरांत करण्यात आलेल्या या सव्र्व्हेनुसार आयोडाइज्ड मिठाच्या वाढत्या वापरामुळे आयोडिनची कमतरता कमी झाली आहे. मात्र, या सर्व्हे नुसार राष्ट्रीय स्तरावर आयोडीनचे प्रमाण १५ पार्ट्स प्रती दशलक्ष (पीपीएम) समान किंवा त्याहून अधिक असलेले घरगुती कव्हरेज फक्त ७६.३ टक्के आहे. पंजाबमध्ये पुरेशा प्रमाणातील आयोडाइज्ड मिठाचे घरगुती कव्हरेज केवळ ८४.७ टक्के असून ६१.५ टक्के लोकांना आजही आयोडाइज्ड मिठाची माहिती नाही.