भारतीय रेल्वेचं उत्पन्न ७६ टक्क्यांनी वाढलं

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२२ । भारतीय रेल्वेला यंदा भरघोस उत्पन्न मिळालं आहे, एप्रिल ते नोव्हेंबर २०२२  या कालावधीत एकूण अंदाजीत उत्पन्न ४३ हजार ३२४  कोटी रुपये होतं, मागच्या वर्षीच्या याच कालावधीतल्या २४ हजार ६३१ कोटी रुपये उत्पन्नाच्या तुलनेत यात ७६ टक्क्याने वाढ झाली आहे.

१ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत सुमारे ५ हजार ३६५ लाख प्रवाशांनी आरक्षण सेवेचा लाभ घेतला. मागच्या वर्षी याच कालावधीत ही संख्या ४ हजार ८६० लाख इतकी होती. यंदा त्यात १०% नं वाढ झाली.

१ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत प्रवासी आरक्षणातून रेल्वेला मिळालेलं महसूली उत्पन्न ३४ हजार ३०३ कोटी रुपये इतकं असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत प्रवासी आरक्षणातून रेल्वेला मिळालेलं महसूली उत्पन्न २२ हजार ९०४  कोटी रुपये होतं, त्यात यावर्षी ५०% इतकी वाढ झाली.

१ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत सुमारे ३५ हजार २७३  लाख इतक्या प्रवाशांनी रेल्वेच्या अनारक्षित प्रवासी सेवेचा लाभ घेतला. मागच्या वर्षी याच कालावधीत ही संख्या १३ हजार ८१३ लाख होती. यात यावर्षी तब्बल १५५ % इतकी वाढ झाली. १ एप्रिल ते ३०  नोव्हेंबर २०२२ या कालावधीत रेल्वेला अनारक्षित प्रवासी सेवेतून ९ हजार २१ कोटी रुपयांचं महसुली उत्पन्न मिळालं. मागच्या वर्षीच्या याच कालावधीत ते १ हजार ७२८  कोटी रुपये इतकं होतं. यात यंदा ४२२ % ची वाढ झाली.