मुंबईसह बंगाल आणि झारखंडमध्येही बांगलादेशी घुसखोरांचे मतदान? राज्य निवडणूक आयोग चौकशी करणार

नवी दिल्ली : झारखंड आणि पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागात बेकायदेशीर घुसखोरांच्या माध्यमातून जास्त मतदान झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. असे समोर आले आहे की एका बूथवर मतदारांची संख्या १०० टक्क्यांहून अधिक राहिली आहे, जी अशक्य बाब आहे. याबाबत आता राज्य निवडणूक आयोग चौकशी करणार आहे. या बूथशी बांगलादेशी घुसखोरांची नावे जोडली गेली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवडणूक आयोग लवकरच साहेबगंज जिल्ह्यातील राजमहल विधानसभा मतदारसंघात एक टीम पाठवणार आहे. ही टीम येथील मतांची वाढ तपासणार आहे. राजमहल विधानसभेचा मोठा परिसर पश्चिम बंगालच्या सीमेला लागून आहे. २०१९ च्या तुलनेत येथे एका बूथवर मतांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. राजमहल ब्लॉक बूथवर ११७ टक्याची वाढ दिसून आली आहे. २०१९ मध्ये या बूथवरील मतदारांची संख्या ६८९ होती, जी २०२४ मध्ये १४०० च्या पुढे गेली आहे. ज्या बूथमध्ये वाढ झाली आहे त्यापैकी बहुतेक बूथ गंगा ओलांडून दियारा भागात आहेत आणि त्यांची सीमा पश्चिम बंगालला लागून आहे.

भाजपचे स्थानिक आमदार अनंत ओझा यांनी राजमहल विधानसभेतील मतदारांची संख्या अचानक वाढल्याने राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आमदार ओझा म्हणाले की, २०१४ ते २०१९ या काळात ज्या भागात ९००० मते वाढली होती, त्या भागात २०१९ ते २०२४ या कालावधीत २४००० मते वाढली, ही गोष्ट धक्कादायक आहे. ओझा पुढे बोलताना म्हणाले की, त्यांच्या विधानसभेत पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागात मतांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे, तर हिंदूबहुल बूथवर मते कमी झाली आहेत.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशी १७ बूथ आहेत जिथे गेल्या पाच वर्षात हिंदू मते कमी झाली आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अनेक हिंदू मतदार होते ज्यांना वैध मतदार ओळखपत्र असूनही मतदान करण्याची संधी मिळाली नाही, असा आरोप त्यांनी केला. त्यांचे नाव यादीतून गायब होते.

आमदार ओझा म्हणाले की, लोक मतदान करू शकत नसल्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणात आहेत आणि यामध्ये स्वतः उपप्रमुख असलेल्या लोकांचाही समावेश आहे. याप्रकरणी आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले. अशा ७३ बूथबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत.