तळोदा : तालुक्यातील काजीपुर शिवारात नरभक्षक बिबट्यांना पिंजरा लावून जेरबंद करण्यात तळोदा मेवासी वन विभागाला यश आले असले तरी या पिंजऱ्यातील तीन बिबट्यांना इतरत्र सोडण्यासाठी येथील अधिकाऱ्यांना कडून हिरवा कंदील मिळाला नसल्याने मोठी अडचण वनअधिकाऱ्या पुढे उभी ठाकली आहे. या तिन्ही बिबट्यांच्या मुक्काम तळोदा मेवासी उपवनसंरक्षक विभागात वाढला आहे. वरिष्ठ कार्यालयामधून शनिवार , २४ रोजी कोणतेही आदेश पारीत न झाल्याने त्यांचा पाहुणचार मेवासी कार्यालयात केला जात आहे.
तळोदा तालुक्यातील चिनोदा शिवारात 13 ऑगस्ट 2024 रोजी या परिसरात मुक्त संचार करणाऱ्या नरभक्षक बिबट्याने नववर्षीय मुलावर हल्ला करून त्यास ठार केल्याची खळबळ जनक घटना घडली होती. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहावयास मिळाला. या भागात वन विभागाने पिंजरा लावला परतू बिबटया जेरबंद झाला नाही. आठवड़ा पूर्ण होत नाही तोवर काजीपूर शिवारात दि 20 रोजी आजीसह नातवाला हल्ला करून ठार केल्याचा घटनेने सर्व जिल्हाभर पुन्हा हादरला. याघटने मुळे नरभक्षक बिबटयाला 21ऑगस्ट 2024 रोजी जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले.
परतू त्यांचे तीन साथीदार परिसरातील मुक्तसंचार करित असल्याने नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या संताप अनावर झाला. या नरभक्षक बिबट्याना जेरबंद प्रयत्न करण्यातआले लावलेल्या पिंजऱ्यात दि 22 रोजी दोन बिबटे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.
या बिबट्यांना इतरत्र ठिकाणी सोडण्यासाठी मुंबई पुणे नागपूर नाशिक येथील राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, या बिबट्यांना संबंधित ठिकाणी सोडण्यासाठीची परवानगी तळोदा मेवाशी वन विभागाकडून केली असतांना अद्यापी कोणीही परवानगी दिली नसल्याने सध्या तरी या जेरबंद झालेल्या बिबट्यांच्या मुक्काम उपवनसंरक्षक कार्यालयातच असून त्यांच्या पाहुणचार देखील याच ठिकाणी केला जात आहे. याबाबत तळोदा मेवासी वन विभागाचे उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील यांच्याशी संपर्क केला असता मुंबई पुणे नागपूर येथे या बिबट्यांना सोडण्यासाठी परवानगी मागितली असून परवानगी मिळाल्यानंतर या बिबट्यांना सोडण्यासाठी बंदोबस्तात रवाना केले जाईल
दरम्यान, शनिवार, २४ रोजी देखील जेरबंद बिबट्याचा मुक्काम तळोदा मेवासी उपवनरक्षक कार्यालयातच आहे. शनिवार, रविवार असल्यामुळे आजपर्यंत बिबटयाची मुक्तातात करण्यासदर्भात वरिष्ठ कार्यालयामधून आदेश पारीत न झाल्याने त्यांचा पाहुणचार मेवासी कार्यालयात केला जात आहे.