Stock Market : आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. BSE चा सेन्सेक्स 106 अंकांनी घसरून 81602च्या पातळीवर खुला झाला. तर निफ्टी 50 हा 43 अंकांच्या घसरणीसह 24633 च्या पातळीवर खुला झाला .
शुक्रवारी बाजारात किंचित घसरण झाली असली, तरी बाजारात रिकव्हरी दिसून आली होती. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (एफआयआय) शुक्रवारी पुन्हा विक्री झाली. सलग तीन दिवस खरेदी केल्यानंतर शुक्रवारी एफआयआयनं रोखीनं विक्री केली. कॅश आणि स्टॉक फ्युचर्समध्ये सुमारे3425 कोटी रुपयांची विक्री झाली.
सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात एफएमसीजी शेअर्समध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे . यात एचयूएल, मॅरिको, डाबर मध्येही घसरण झाली. प्रायव्हेट बँक, रियल्टी, कन्झ्युमर ड्युरेबल्स, फायनान्शिअल शेअर्समध्ये तेजी होती.
जागतिक बाजारातून काही प्रमाणात घसरणीची चिन्हे आहेत. Nasdaq आणि S&P ने देखील अमेरिकेतील अपेक्षित रोजगार डेटामुळे शुक्रवारी नवीन उच्चांक गाठला. Nasdaq 150 अंकांनी वधारला तर Dow 125 अंकांनी घसरला. आज सकाळी GIFT निफ्टी 50 अंकांनी घसरला आणि 24725 च्या जवळ व्यवहार करत होता तर डाऊ फ्युचर्स सपाट होता. निक्की 50 अंकांनी वर होता.