तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने भाजप विरोधात रचले होते षडयंत्र : मुख्यमंत्री शिंदे

 

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौप्यस्फोट तत्कालीन महाविकास आघाडी सरकारबाबत गौप्यस्फोट केला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या काही मंत्र्यांना अटक करण्याचा षडयंत्र रचले होते असे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राला मुलाखतीत केला आहे. या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार , उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. तसेच महाविकास आघाडी ही देवेंद्र फडणवीस, गिरिश महाजन आणि आशिष शेलार यांना अटक करणार होते, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

मुलाखातीत शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाताखाली काम करण्याचा अनुभव अतिशय वाईट होता. त्यांच्या सोबत काम करतांना सतत माझा अपमान झाला. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हे मंत्री म्हणून काम करून देत नव्हते. आदित्य ठाकरे सतत माझ्या नगरविकास खात्यात ढवळाढवळ करत होते. आदित्य ठाकरे हे ,एमएमआरडीए, सिडको आणि एमएसआरडीसीच्या बैठका घेत असत. हीबाब मी उद्धव ठाकरे यांना सांगितली, परंतु, पुत्र प्रेमापोटी त्यांनी काहीच केले नाही. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविण्याची उद्धव ठाकरे यांना घाई होती. परंतु, उद्धव ठाकरे यांना माझा अडथळा असल्याचे मला जाणवले. तसेच पुढे त्यांनी उद्धव ठाकरे यांनी आपणास मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. शिंदे म्हणाले की ज्या दिवशी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान झालं, त्या दिवशी आम्ही सूरतसाठी निघालो. वसईत असताना माझे आणि उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं. त्यांनी मला मुख्यमंत्रिपदाची ऑफरही दिली. पण आता खूप उशीर झाल्याचे मी त्यांना सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत भाजप नेत्यांशीही संपर्क साधला. ठाकरे यांनी भाजपला युतीचाही प्रस्ताव दिला होता.