---Advertisement---

Maharashtra News : मुहूर्त ठरला ! पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत ‘या’ दिवशी होईल महायुतीचा शपथविधी

by team
---Advertisement---

राज्यात महायुतीचा शपथविधी सोहळाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे. अशातच या शपथविधी सोहळ्याबाबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. यात त्यांनी शपथविधी कधी होणारं आहे याचे संकेत दिले आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवार, ३०  रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर X वर पोस्ट करत शपथविधी सोहळ्याची माहिती दिली आहे.  या पोस्टमध्ये महायुती सरकारचा शपथविधी सोहळा कधी व कुठे होईल याची माहिती देण्यात आली आहे.  X वर पोस्टवर ५ डिसेंबररोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदानावर पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान  होऊन २३ नोव्हेंबरला निकाल लागला आहेत. यात महायुतीला ऐतिहासिक यश मिळाले आहे.  ही निवडणूक मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली गेली.  यामुळे  एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावे, अशी अपेक्षा शिंदेंच्या शिवसेनेची आहे. मुख्यमंत्री  शिंदे यांनी महायुती ठरवेल त्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा देऊ असे स्पष्ट केले आहे.

महायुतीत सर्वात जास्त जागा म्हणजेच १३२  जागा ह्या भाजपाकडे आहेत. यामुळे भाजपाचाच मुख्यमंत्री बनेल असे संकेत आहेत. भाजपातर्फे देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली जात आहे. परंतु,  भाजपाने  मुख्यमंत्री पदाचे नाव अद्यापही जाहीर  केलेलं नाही.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment