दुर्दैवी! दहावीचा पेपर देण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांचा करुण अंत

नाशिक : सिन्नरमधून एक धक्कादायक घटना उघडीस आली आहे. दहावीच्या पहिला पेपर देण्यासाठी जात असलेल्या दोन मित्रांवर काळाने घाला घातला आहे. सिन्नर शहराजवळील पांढुर्ली येथे परीक्षा केंद्रावर मराठीचा पहिला पेपर देण्यासाठी जात असताना दोन मित्राचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. शुभम रामदास बरकले आणि दर्शन शांताराम आरोटे असे दोघांचे नाव आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून दहावीच्या परीक्षेपूर्वीच अशा पद्धतीने अपघात झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगासखिंड येथील माध्यमिक शाळेत दहावीत शिकणारे विद्यार्थी शुभम रामदास बरकले आणि दर्शन शांताराम आरोटे हे दोन मित्र पांढुर्ली येथील जनता विद्यालय येथे आज (2 मार्च) आपल्या ऍक्टिव्हा या दुचाकीवरुन जात असताना आगासखिंड येथे भरधाव वेगाने येणाऱ्या एच पी गॅसचा टँकरने धडक दिल्यामुळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून दहावीच्या परीक्षेपूर्वीच अशा पद्धतीने अपघात झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.