अमेरिका पाकिस्तानला देणार एफ-१६ विमानांचे प्रगत तंत्रज्ञान

---Advertisement---

 

वॉशिंग्टन : एफ-१६ लढाऊ विमानांना अद्यावत करण्यासाठी लागणारे प्रगत तंत्रज्ञान पाकिस्तानला देण्यास अमेरिकन काँग्रेसने मंजुरी दिली. अमेरिकेच्या संरक्षण सुरक्षा विभागासोबत झालेला करार ६८६ मिलियन डॉलर्सचा (६१ अब्ज ९८ हजार कोटी ६५ हजार ७०० रुपये) आहे. अमेरिकेच्या संरक्षण सुरक्षा विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, पाकिस्तानला एफ-१६ लढाऊ विमानांच्या आधुनिकीकरणासाठी प्रगत तंत्रज्ञान देण्यासाठी करार झाला होता. कराराचे दस्तावेज सोमवारी काँग्रेसमध्ये सादर करण्यात आले.

काँग्रेसने या कराराला मान्यता दिली. या कारारांतर्गत विमानासाठी लागणारे उपकरणे, अद्यावत करण्यासाठी लागणारे साहित्य आणि प्रशिक्षण यांचा समावेश आहे. अमेरिकेच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे पाकिस्तानच्या वायुदलातील एफ १६ विमानांचे आधुनिकीकरण होणार आहे. असून, विमानांची सुरक्षितता आणि आयुष्यमान २०४० पर्यंत वाढेल. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा भाग आणि राष्ट्रीय सुरक्षा उद्दिष्टांना लक्षात घेऊन हा करार झाला आहे. ज्यामुळे पाकिस्तानला दहशतवादविरोधी प्रयत्नांसाठी आणि भविष्यातील आपत्कालीन परिस्थितींसाठी अमेरिकेच्या सुरक्षा दलांसोबत परस्परसंवाद राखता येईल.

भारताची चिंता काय आहे?

काही तज्ज्ञांच्या मते, लिंक-१६ सारख्या तंत्रज्ञानामुळे पाकिस्तानला अमेरिकेच्या पातळीवरील लढाऊ माहिती प्रणालींमध्ये प्रवेश मिळेल. यामुळे सीमा पाळत ठेवणे, समन्वित हल्ले आणि अडथळे यासाठी त्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होईल. भारत सध्या रशियन आणि इस्रायली प्रणाली वापरत असल्याने, या अपग्रेडमुळे धोरणात्मक संतुलनावर परिणाम होऊ शकतो.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---