जेरबंद बिबट्यांसाठी वरिष्ठांच्या आदेशाची सहाव्या दिवशी प्रतीक्षा कायम, मोबाईल मॅसेजने भीतीचे वातावरण

तळोदा :  शहरापासून केवळ २ किलोमीटरअंतरावर असलेल्या काजीपुर शिवारात नरभक्षक तीन बिबट्यांना सापळा(पिंजरा) लावून जरेबंद करण्यात तळोदा मेवासी वन विभागाला यश आले मिळाले आहे. परंतु, या पिंजऱ्यातील तीन बिबट्यांना इतरत्र सोडण्यासाठी येथील अधिकाऱ्यांना वरिष्ठअधिकाऱ्यान कडून हिरवा कंदील मिळाला नसल्याने मोठी अडचण वनअधिकाऱ्या पुढे उभी ठाकली आहे.  या तिन्ही  बिबट्यांच्या गेल्या सहा दिवसांपासून तळोदा मेवासी उपवनसंरक्षक विभागाचा कार्यालयात मुक्काम आहे.  दरम्यान, चिनोद रस्त्याजवळ एक बिबट्या फिरत असल्याचा मोबाईल मॅसेजने नागरिकामंध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बुधवार, २१ ऑगस्ट रोजी एक बिबटयास जेरबंद करण्यात आले.  पुन्हा या ठीकाणी परत दोन सापळे गुरुवार  २२ रोजी लावण्यात आले.  त्यामध्ये दोन बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.  मात्र ,  या जेरबद करण्यात आलेल्या बिबट्याना इतरत्र सोडण्याची परवागी अजुन मिळाली नसल्याने गेल्या सहा दिवसान या तीन्ही बिबट्याचा पाहूचार मेवासी वन विभागा शहादा रोड वरिल कार्यालयात होत आहे.

मेवाशी वन विभागाचे उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील यांच्याशी संपर्क केला असता असे  सांगितले की,  ह्या तिन्ही  बिबट्याना मुंबई, नाशिक, नागपूर या ठिकाणी प्रत्येकी एक बिबट्याला सोडण्यासाठी परवानगी मागितली आहे. हि परवानगी एक दोन दिवसात मिळेल. नंतर या बिबट्यांना एक ठिकाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात येईल. तिघा  बिबट्याना एकाच ठिकाणी सोडण्यात येणार नाही.

तळोद्यात दहशतीचे वातावरण
रविवार २५ रोजी चिनोदा रस्त्याजवळील नगरपालीकेचा कचरा डेपोजवळ रात्री ९. ३० वाजता बिबटया मुक्तसंचार करित असल्याचे शहरातील एका डॉक्टर ने पाहील्याच्या मॅसेस मोबाईलवर फिरू लागला आहे. यामुळे या भागात राहाणाऱ्या नागरिकांमध्ये  प्रंचड भितीचे वातावरण आहे.  या भागातील रस्त्यांवर सायकांळपासून कोणी मनुष्य फिरत नाही प्रत्येक नवीन वसाहतीमध्ये अशी स्थिती आहे.