तरुण भारत लाईव्ह । २४ मे २०२३। महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा विद्यार्थ्यांसह पालकांना आहे. अशातच निकालाबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड 25 मेपर्यंत निकालाची तारीख जाहीर करणार आहे. त्यांनतर लगेचच 27 तारखेपर्यंत निकाल जाहीर होणार आहे. इयत्ता दहावीचा निकालही जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचीही निकालाची प्रतिक्षा संपुष्टात येणार आहे.
खरंतर फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या या परिक्षांचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर केला जातो. त्यानुसार महाराष्ट्र स्टेट बोर्ड लवकरच निकालाची तारीख जाहीर करणार आहे. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स तिन्ही विभागांचा निकाल महाराष्ट्र स्टेट बोर्टच्या अधिकृत वेबसाईटवर mahresult.nic.in पाहता येईल.
महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahresult.nic.in) जावून HSC result 2023 या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.
महाराष्ट्र स्टेट बोर्डकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार, निकाल घोषित करण्याची संपूर्ण तयारी झाली आहे. लवकरच निकाल घोषित करण्यात येईल. निकाल लागल्यानंतर काही दिवसातच विद्यार्थ्यांना त्यांचे ओरिजिनल मार्कशीट कॉलेजमधून मिळून जातील.