---Advertisement---
तरुण भारत लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२२ । पुणे जिल्ह्यातील २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष बाब म्हणजे, त्याने ‘एक दिवस सगळ्यांच्या स्टेट्सला माझा फोटो असणार आणि कॅप्शन असणार RIP’ असं स्टेट्स व्हॉट्सअपवर ठेवून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आत्महत्येमागे सेक्सटॉर्शन प्रकार असल्याचा संशय नातेवाईकांमधून व्यक्त करण्यात आला आहे. संकेतने वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी टोकाचे पाऊल उचलल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.