जळगाव : जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी तरुणीची सोशल नेटवर्क साईटवर उत्तर प्रदेशातील तरुणासोबत ओळख झाली. या माध्यमातून तिच्याशी त्या व्यक्तीने मैत्री दृढ केली. या मैत्रीचा गैरफायदा घेत तरुणाने आपल्या मित्रांसोबत थेट उत्तर प्रदेशातून तिचे गाव गाठले. त्यांनी तरुणीसह तिच्या कुटुंबाशी वाद घातला. हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच नागरिकांनी तरुणासह त्याच्यासोबत आलेल्या तीन जणांना चोप दिला व यावल पोलीस ठाण्यात आणले. ही घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी तरुणीच्या आईने उत्तर प्रदेशातील तरुणाविरुद्ध तक्रार दिली.
सोशल नेटवर्कच्या माध्यमातून यावल तालुक्यातील एका गावातील एका तरुणीची ओळख उत्तर प्रदेशातील जोनपूर जिल्ह्यातील सहागंज तालुक्यातील जरनापूर टपरी येथील शिवम रवींद्रकुमार अस्थाना (२६) या तरुणाशी झाली. ओळखीनंतर ते सोशल नेटवर्क एकमेकांशी बोलू लागले. ातून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून शिवम अस्थाना हा त्याचे तीन मित्र असे चार जण शनिवारी थेट अट्रावल गावात या तरुणीच्या घरी पोहोचले. या तरुणाला पाहून तरुणी आवाकच झाली व या चौघांनी या तरुणीशी आणि तिच्या आईशी वाद घालायला सुरुवात केली. अनोळखी मुलं काय वाद घालत आहे हे पाहून गावातील ग्रामस्थांची गर्दी जमली आणि त्यांनी या चौघांना चांगलाच चोप दिला आणि यावल पोलीस ठाण्यात आणले. यावल पोलीस ठाण्यात तरुणीची आईने उत्तर प्रदेशातील तरुणाविरुद्ध तक्रार दिली.