पाचोरा : येथील सारोळा रोडवरील टेली फोन ऑफिसमध्ये झालेल्या चोरी प्रकरणीतील आरोपीस पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केली. त्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पाचोरा येथील सारोळा रोडवर फिर्यादी नामे शरद अजबराव पाटील (४९) नोकरी (टेलीफोन ऑफिस येथे
बॉचमेन), (रा. जारगांव) यांनी फिर्याद दिली की, १३ रोजी १० ते १७ वा. दरम्यान सारोळा रोडवरील बी.एस.एन.एल. ऑफिस बंद असताना ऑफिसचे पाठीमागील खिडकीचे कोणत्यातरी हत्याराने काचा फोडुन खिडकी उचकटवून अज्ञात चोरट्याने आतमध्ये प्रवेश करुन फिर्यादी च्या संमतीशिवाय लबाडीचे इरादयाने ऑफिस मधील १) १०,०००/- रुपये किंमतीची एक निळया रंगाची SF SONIC कंपनीची बॅटरी त्यावर ZAMINDAR 1080 असे लिहलेले जु. बा. किं.सु. २) २,०००/- रुपये किंमतीचे एक लहान ट्रान्सफॉर्म, जु.वा. किं.सु. ३) ३,००० /- रुपये किंमतीची एक निळया रंगाची कॉपर केबल, जु. बा. किं.सु. असा एकूण १५,०००/- रुपये किंमतीचा माल हा अज्ञात आरोपीताने चोरुन
नेलेबाबत पाचोरा पोलीसात गु. रजि. क्रमांक ३१९/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३), ३०५ प्रमाणे दिनांक १३/०७/२०२४ रोजी दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. अंमलदार पोहेकॉ राहुल शिंपी,पोकों योगेश सुरेश पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज व गुन्हयाचे तांत्रीक विश्लेषणाचे आधारे तसेच गुन्हयाचा तपास चालू असतांना संशयीत इसम हा बसस्थानक परीसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती आहे पोहेकॉ राहुल शिंपी यांना मिळाल्याने त्यांनी पाचोरा बसस्थानक परिसरातुन सलमान शेरु पिंजारी (वय -२१) (रा. कुर्बान नगर, बाहेरपुरा, पाचोरा जि. जळगांव, सध्या रा. हाजीमंजील, जळगांव काटयाजवळ, जळगांव) यांस ताब्यात घेवुन गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा मी व माझे सोबत असलेला जावेद उर्फे जाबीर बल्लु पिंजारी ( वय -२१) ( रा. कुर्बान नगर, पाचोरा) याने
केला आहे. असा कबुली दिल्याने त्यास पाचोरा पोलीस स्टेशन येथे आणुन त्याची गुन्हयाचे संदर्भात प्राथमिक चौकशी केली असता त्याचा सदर गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून त्याचेकडुन चोरीस गेलेला वरील मुददेमाल हा हस्तगत करण्यात आला आहे. दुसरा आरोपी हा पळुन गेला आहे. सदर गुन्हयातील आरोपी यास अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगांव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक पवार पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी, पोकों योगेश
सुरेश पाटील यांनी पार पाडली.