मंदीरात चोरी : अवघ्या २४ तासांत दोघे आरोपी गजाआड

तरुण भारत लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२२ । शहादा शहरातील श्री. सुघोषाघंट मंदीरात (जैन दादावाडी) मंगळवारी झालेल्या धाडसी चोरीचा नंदुरबार पोलिसांनी अवघ्या २४ तासात छडा लावला असून मध्यप्रदेश राज्यातून दोन आरोपींना अटक केली आहे. सुल्तान शेख रशिद शेख वय १९ वर्षे मुळ राहणार लाचीवाडा, जि. दाहोत (गुजरात) हल्ली मुक्काम – सनावद जि. खरगोन (मध्यप्रदेश) व सुरज नवलसिंग ठाकूर, वय २० वर्षे, धंदा – ड्रायव्हर, मूळ रा. अकोला, ता. जि. अकोला (महाराष्ट्र) हल्ली मुक्का-सनावद जि. खरगोन (मध्यप्रदेश) असे आरोपींचे नाव आहे.  त्यांचेकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. 

 

शहाद्यातील मंदिरातील चोरीची घटना नागरिकांच्या धार्मिक भावनेशी निगडीत असल्याने नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटीलउप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरेस्थानिक गुन्हे शाखा नंदुरबारचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकरशहाद्याचे प्रभारी सहाय्यक  पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली होती. त्याच वेळी पी. आर. पाटील यांनी गुन्हयांतील आरोपीतांना तात्काळ अटक करुन गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत व आरोपीतांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील अनेक सी. सी. टी. व्ही. तपासून आरोपीतांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला, परंतु फुटेज अस्पष्ट असल्यामुळे आरोपीतांची निश्चित ओळख होत नव्हती. पी. आर. पाटील यांना बुधवारी गुप्त माहीती मिळाली कीसदर चोरी ही मध्यप्रदेश राज्यातील खरगोन जिल्हयातील सनावद येथील सराईत गुन्हेगार सुल्तानशेख व सुरज ठाकुर यांनी मिळुन केलेली आहे. तसेच दोन्ही आरोपीतांवर यापुर्वी देखील मालमत्तेविरुध्द गुन्हे दाखल आहेत. त्यांनी  किरणकुमार खेडकर यांना कळवून आरोपींना ताब्यात घेवून माहीतीची खात्री करुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.

पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी पोलीस उप निरीक्षक अनिल गोसावीपोलीस हवालदार दिपक गोरेपोलीस नाईक विकास कापूरेमोहन ढमढेरे पोलीस अंमलदार अभय राजपूतशोएब शेख यांचे एक पथक तयार करुन मध्यप्रदेश राज्यातील सनावद जिल्हा खरगोन येथे रवाना केले. आरोपी वेषांतर करून लपून बसले असल्याने मोठ्या शिताफीने पथकाने आरोपींच्या घराच्या आजू-बाजूला वेषांतर करुन सापळा रचला व त्यांच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर पाळत ठेवलीएक दिवस कोणतीही हालचाल दिसून आली नाही. मात्र दुसऱ्या दिवशी घरी आले असता  पथकाने अत्यंत शिताफिने सुल्तान शेख रशिद शेख वय १९ वर्षे मुळ राहणार लाचीवाडा, जि. दाहोत (गुजरात) हल्ली मुक्काम – सनावद जि. खरगोन (मध्यप्रदेश) व सुरज नवलसिंग ठाकूरवय २० वर्षेधंदा – ड्रायव्हरमूळ रा. अकोलाता. जि. अकोला (महाराष्ट्र) हल्ली मुक्का – सनावद जि. खरगोन (मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेतले. पोलीस खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आणि मुद्देमालाची माहिती दिली. पथकाने सुल्तान शेख याच्या बॅगेतून ४१३१० रुपये रोख रक्कम व सूरज ठाकूर याच्या बॅगेतून ३९८०० रुपये रोख अशी एकूण ८१३१० रूपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.

दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी मागील काही काळात महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये सुमारे १२ वेगवेगळ्या मंदीरातून अशाच प्रकारची चोरी केलेली असल्याचे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही संशयीत आरोपीतांकडून महाराष्ट्रासह मध्य प्रदेश राज्यातील एकुण १२ गुन्हे उघडकीस आल्याने त्यांना मुद्देमालासह गुन्ह्याचे पुढील तपासकामी शहादा पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंदीरातील चोरी सारखा अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा २४ तासाचे आत उघडकीस आणल्याने नागरिकांनी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे अभिनंदन केले आहे. गंभीर गुन्हा उघडकीस आणणाऱ्या पथकास जिल्हा पोलीस अधीक्षकांनी  दहा हजार रुपये रोख बक्षिस जाहीर केले आहे.