नंदुरबार : बँक आँफ इंडीयाच्या एटीएममधून तब्ब्ल ६१ लाख ९१ हजार ५०० रुपयांची रोकड चोरी केल्याची घटना समोर आली आहे. पोलीस सूत्रानुसार, सीएमएस इन्फोसिस्टीम एलईटी या कंपनीच्या कर्मचार्याला कंपनीकडून कोणत्याही प्रकारच्या एटीएममध्ये (ATM) पैसे भरण्याचे आदेश नसताना त्याने कंपनीकडून एक्स्ट्रॉ बॅकअप चावी मिळवून नंदुरबार, विविध परिसरातील एटीएममधून तब्ब्ल ६१ लाख ९१ हजार ५०० रुपयांची रोकड चोरी केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील भाट गल्ली परिसरात राहणारा पंकज किशोर चौधरी हा सीएमएस इन्फोसिस्टीम एलईटी या कंपनीचा कर्मचारी आहे. त्याला कंपनीकडून कोणत्याही प्रकारच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचे आदेश नसताना त्याने कंपनीकडून एक्स्ट्रॉ बॅकअप चावी मिळवून, चावीचा गैरउपयोग करुन वेळोवेळी शहरातील तसेच नवापूर व रायंगण येथील एटीएममधून ६१ लाख ९१ हजार ५०० रुपयांची चोरी केली.
दि.५ ते २३ डिसेंबरदरम्यान त्याने मिराज सिनेमाजवळ असलेल्या एसबीआयच्या एटीएममधून १६ लाख, सिंधी कॉलनीतील एसबीआयच्या एटीएममधून २१ लाख ९९ हजार ५००, रायंगण ता.नवापूर येथील एसबीआय एटीएममधून ५ लाख रुपये, नवापूर येथील युनीयन बँक आँफ इंडीयाच्या एटीएममधून ९ लाख ९२ हजार अशा एकुण ६२ लाख ९१ हजार ५०० रुपयांची रोकड चोरी केली.
याप्रकरणी राहूल प्रभाकर मानकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंकज किशोर चौधरी याच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर करीत आहेत.