---Advertisement---

अंगणात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरची बॅटरी चोरी, चौघांविरोधात गुन्हा दाखल

by team

---Advertisement---

यावल :  तालुक्यातील साकाळी गावात घरा बाहेर लावलेल्या ट्रॅक्टरमधील दोन बॅटरी चोरी झाल्याची घटना उघड झाली आहे.  याप्रकरणी  गावातील चौघांविरोधात यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चौघांकडून बॅटरी जप्त केली आहे.

यावल तालुक्यातील साकळी या गावातील मुजूमदार नगरात सय्यद अश्पाक सय्यद शौकत (३२) राहतात. त्यांनी  घराच्या अंगणात  स्वतः चे दोन ट्रॅक्टर उभी केली होती. या त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये त्यांनी लिव्हगार्ड कंपनीच्या १२  हजार रुपये किमतीच्या दोन बॅटरी लावल्या होत्या. या दोन्ही बॅटरी चोरीस गेल्या. ही चोरी भूषण राजू तायडे, दशरथ शालिक भालेराव, साहिल उर्फ समाधान रवींद्र सुरवाडे व रणधीर विलास सोनवणे (सर्व रा.साकळी) या चार जणांनी केली. ही चोरीची घटना रविवारी उघड होताच सोमवारी यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. चौघांकडून पोलिसांनी दोन्ही बॅटरी हस्तगत देखील केल्या आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अर्जुन सोनवणे करीत आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---