विधानसभेत दिग्गजांना पराभूत करणारे ‘हे’ आहेत 8 ‘जायंट किलर’

विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपला आतापर्यंतचं मोठं यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. महायुतीने 236 जागांवर विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीला 50 चा आकडा गाठणंही मुश्कील झाल्याचं पाहायला मिळालं. विधानसभेच्या या निकालानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, या निवडणुकीत महाविकास आघाडीतील अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. यामध्ये काँग्रेसचे विधीमंडळाचे गटनेते बाळासाहेब थोरात , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा समावेश आहे.

महाविकास आघाडीची सत्ता आल्यास काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे दोन नेते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चालू होती. मात्र, काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला.

महाराष्ट्रातील आठ जाएंट किलर्स

बाळासाहेब थोरांताना पराजित करणारे शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ (संगमनेर विधानसभा मतदारसंघ)

पृथ्वीराज चव्हाणांना पराजित करणारे भाजपचे अतुल भोसले (कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ)

धीरज देशमुखांना पराजित करणारे भाजपचे रमेश कराड (लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ)

राजेश टोपेंना पराजित करणारे शिवसेना शिंदे गटाचे हिकमत उधाण (घनसावंगी विधानसभा मतदारसंघ)

यशोमती ठाकूरांना पराजित करणारे भाजपचे राजेश वानखेडे (तिवसा विधानसभा मतदारसंघ)

बच्चू कडूंना पराजित करणारे भाजपचे अमोल तायडे (अचलपूर विधानसभा मतदारसंघ)

सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंना पराजित करणारे शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत (माहीम विधानसभा मतदारसंघ)

हितेंद्र ठाकूरांना पराजित करणारे भाजपच्या स्नेहा दुबे (वसई विधानसभा मतदारसंघ)