IPL Auction 2025 : अजिंक्य रहाणेसह ‘हे’ स्टार खेळाडू राहिले अनसोल्ड; नेमकं काय आहे कारण?

#image_title

IPL Auction 2025 : आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी 24 आणि 25 नोव्हेंबरला सौदी अरेबियातील जेद्दाह येथे मेगा लिलाव होत आहे. या लिलावात एकूण 204 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. या लिलावात 10 संघ मिळून 641 कोटी रुपये केले जाणार आहेत.

आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली असून सुरुवातीलाच अनेक स्टार खेळाडूंची नावं आली. मात्र अजिंक्य रहाणे, केन विलियम्सन, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर हे स्टार खेळाडू अनसोल्ड राहिले.

अजिंक्य राहणे बद्दल बोलोयाचे झाले तर, मागील पर्वात अजिंक्यला १३ सामन्यांत २४२ धावा करता आल्या होत्या. २०२३ च्या हंगामानुसार यावेळसही चेन्नई सुपर किंग्सकडून त्याची बोली लागेल असं वाटलं होत. परंतु त्याचा सध्याचा फॉर्म आणि वाढतं वय यामुळे त्याच्यावर बोली लावणे कोणत्याच फ्रँचायझीने पसंत केले नाही.

पृथ्वी शॉ ला मागील तीन पर्वात आयपीएलमध्ये काही खास कामगिरी करता आलेली नाही. त्याचे संघातील गैरवर्तन आणि फिटनेस हे २ मुख्य कारण आहेत की त्याला कुणी संघात घेण्यास उत्सुक नाही.

शार्दूल ठाकूरने मागील हंगामात चेन्नईकडून ९ सामन्यांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. परंतु यावेळेस चेन्नई सुपर किंग्स त्याच्यासाठी बोली लावणे पसंत केले नाही. त्यामुळे तोही अनसोल्ड राहिला.

यासह अनमोलप्रीत सिंग, उत्कर्ष सिंग, लवनिथ सिसोदीया, देवदत्त पडिक्कल, कार्तिक त्यागी, यश धुल, उपेंद्र यादव, श्रेयस गोपाळ,अॅलेक्स केरी, केएस भरत, डोनोव्हन फरेरा, शाय होप, डॅरिल मिचेल, केन विलियम्सन, डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, वकार सलामखेल, पियूष चावला, मयांक अग्रवाल, ग्लेन फिलिप्स. हे देखील अनसोल्ड राहिले. आहेत