नेपाळच्या नवीन नाेटांवर भारतातील हे तीन क्षेत्र

#image_title

Nepal New Note : नेपाळची मध्यवर्ती बँक असलेल्या सेंट्रल बँक ऑफ काठमांडूने नेपाळचा सुधारित राजकीय नकाशा दर्शविणाऱ्या १०० रुपयांच्या नवीन नाेटा छापण्यासाठी चायना बँक नोट प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन या कंपनीसाेबत करार केला. या नाेटांवरील नकाशात भारतातील लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापानी हा नेपाळचा भाग म्हणून दाखविण्यात आले आहेत. भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांनी सुमारे ३७२ चौरस किलोमीटरच्या विवादित क्षेत्रावर दावा सुरू ठेवला आहे. हे क्षेत्र उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये समाविष्ट असले तरी. या क्षेत्रांबाबत भारत आणि नेपाळमध्ये मागील सुमारे ३५ वर्षांपासून वाद आहे.

नेपाळने १८ जून २०२० राेजी आपल्या राजकीय नकाशात जारी केला हाेता. यात लिपुलेख, लिंपियाधुर आणि कालापानी नेपाळचा भाग दाखवण्यात आला हाेता. त्यासाठी नेपाळच्या राज्यघटनेतही बदल करण्यात आला. भारताने नेपाळच्या नकाशाचा तीव्र निषेध करीत अशा प्रकारचा कृत्रिम बदल स्वीकारला जाणार नाही, असे स्पष्ट केले हाेते.

भारताने सातत्याने लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुर हे आपल्या सार्वभाैम प्रदेशाचा भाग असल्याचे कायम सांगितले आहे. शेजारी देश नेपाळने पुन्हा एकदा असे कृत्य केल्याने भारतामध्ये नाराजी पसरली आहे. आता नेपाळने १०० रुपयांच्या नाेटांच्या छपाईचे कंत्राट एका स्पर्धात्मक आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रियेनंतर चायना बँक नाेट प्रिंटिंग अ‍ॅण्ड मिंटिंग कॉर्पोरेशनला दिले आहे. या करारानुसार, १०० रुपयांच्या नाेटांच्या ३०० दशलक्ष नाेटांचे डिझाईन, छपाई, पुरवठा आणि वितरण करण्याचे काम ही कंपनी करणार आहे. म्हणजे जवळपास संपूर्ण देशात ही नोट असेल. यासाठी सुमारे ७५ काेटी रुपये खर्च नेपाळ सरकार करणार आहे.