लाडकी बहीण योजनेचा ‘या’ महीलांनाही मिळणार लाभ ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

by team

---Advertisement---

 

मुंबई : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर जाहीर केली असून या अंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला दिड हजार रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाईल. या योजनेसाठी पात्रात नियमावली सरकारने जाहीर केली आहे. यातील काही नियम सरकारने शिथिल केले आहेत. यामुळे या योजनेचा लाभार्थी महिलांची संख्या वाढणार आहे. या योजनेतील महिलांच्या वयात शिथिलता आणण्यात आली आहे. तसेच जमिनीबाबतची अट वगळण्यात आली आले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे.

या योजनेअंतर्गत ज्या महिलांचे वय 21 ते 60 वर्ष आहे, त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे. ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत आहे, त्याच महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे.आधार लिंक असणाऱ्या खात्यात या योजने अंतर्गत थेट दिड हजार रूपये जमा होणार आहेत.

नव्या नियमानुसार कोणात्या महिला पात्र ?
राज्य शासनाने या योजनेतील काही नियम शिथिल केले आहेत. यानुसार पात्र महिलांच्या वयात शिथिलता आणण्यात आली आहे. या महिलांचे वय 65 वर्षे आहे. त्या महिलांनाही या योजनेचा लाभ होणार आहे. पहिल्यांदा वयाची अट ही 21 ते 60 वर्षापर्यंत होती. त्यात बदल करण्यात आला असून त्यात वय 21 ते 65 वर्षापर्यंता करण्यात आले आहे. यासोबतच जमिनीची अटही शिथिल करण्यात आली आहे. ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबाकडे पाच एकर पेक्षा जास्त जमिन असेल ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार होती. परंतु, जमिनीबाबतची अटही आता वगळण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेत करण्यात आलेल्या बदलाची माहिती दिली. त्यानुसार आता 65 वर्षे वय असलेल्या महिलांनाही त्याचा फायदा होईल. पैसे खात्यात जमा होण्यास वेळ लागला तर जुलै महिन्यापासूनचे सर्व पैसे एकदम खात्यात जमा केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. ही योजना महायुतीच्या भावांकडून बहीणींना दिलेला आहेर आहे. ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखा पेक्षा जास्त असेल अशा कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही. या शिवाय घरता कोणी टॅक्स भरत असेल, कुटुंबातली कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल, कोणी निवृत्ती वेतन घेत असेल, ट्रॅक्टर सोडून घरात जर चार चाकी असेल तरही ती अपात्र ठरणार आहेत. ज्या कुटुंबातली व्यक्ती आजी माजी आमदार खासदार असेल तर ती व्यक्तीही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---