खुशखबर : ‘लाडकी बहीण योजने’चा ‘या’ महिलांनाही मिळणार लाभ

मुंबई :  राज्यात सुरु झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांकडून उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा याकरीत काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत 6 नवीन नियम व अटी आणि शर्तींची पूर्तता करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय लवकर लागू करण्यात येईल. या योजनेसाठी नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. यासोबतच एखाद्या महिलेचा जन्म परराज्यामध्ये झालेला असेल आणि तिने महाराष्ट्रात राहणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला तर त्या महिलेला पतीच्या कागदपत्रांवरती योजनेचा लाभ घेता येईल. यासोबतच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी अनेक नवीन नियम लागू केले जातील.

या  नवीन नियमानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरलं जाणार आहे. एखाद्या महिलेचा जन्म परराज्यामध्ये झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्या महिलेला पतीच्या कागदपत्रांवर योजनेचा लाभ मिळेल. ग्रामस्तरीय समितीच्यामार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करावे लागणार आहे.  तसेच त्यात काही बदल असेल तर तोही करावा लागणार आहे. केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे. मात्र, तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा. नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे. ओटीपीचा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात यावा. या योजनेतील लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर केली जाईल.  ही यादी जाहीर होताच त्या यादीत असणाऱ्या महिलांना 15 ते 19 ऑगस्टदरम्यान थेट लाभ मिळणार आहे. यानुसार महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांची 3000 रुपये रक्कम बँक खात्यात जमा केली जातील.