राजस्थान: देशभरात महिलांच्या अत्याचारात वाढ होत आहे,त्यातच राजस्थानमधील भिलवाडा येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री जेवण झाल्या नंतर महिला शतपावली करायला गेली असता. त्यावेळी तीन तरुणांनी तिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.एवढंच करून ते थांबले नाही तर त्यानी महिलेचे कपडेही काढून घेतले.पीडित महिला ही रस्त्यावर विवस्त्र अवस्थेत मदत मागत होती. आणि ती महिला जोरजोरात ओरडून मदत मागत होती. त्यावेळी लोकांनी तिला वेडी समजून मदत केली नाही. मिळालेल्या माहितीनुसार,राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. शनिवारी रात्री जेवण करून एक महिला
बाहेर पडली होती. त्यावेळी तरुणांनी तिचे अपहरण करून तिला जीपमध्ये बसवले.आणि महिलेवर सामूहिक बलात्कार केला. तिन्ही आरोपींनी महिलेला विवस्त्र करून रस्त्यावर सोडले.एका व्यक्तीने महिलेचे म्हणणे ऐकून घेऊन आणि त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.महिलेने अंग झाकण्यासाठी जीपचे सीट कव्हर देण्यात आले.
आणि पिडीत महिलेला पोलीस ठाण्यात नेले महिला कॉन्स्टेबलकडून कपडे मागवून तिला देण्यात आले.पोलिसांना घटनास्थळी पिडीत महिलेच्या तुटलेल्या बांगड्या सापडल्या आहेत. शनिवारी रात्री उशिरा पोलीस उपअधीक्षक कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते.