चाकूचा धाक दाखवला, लूटमार केली, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अमळनेर : चाकूचा धाक दाखवत लूटमार करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी अवघ्या दोन तासात बेड्या ठोकल्या आहे. रमण बापु नामदास रा. मुठे चाळ, स्टेशन रोड, अमळनेर असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकणी पोलिसांत गुन्हा दाखल होता, अखेर पोलिसांनी गुन्हा उघडीस आणला आहे.
अमळनेर येथील शंकर आधार पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली. दि. ८ रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास अमळनेर रेल्वे

स्थानकावरुन त्यांचे मित्र नंदु गणेश चव्हाण यांच्यासह चहा पिवुन परत येत असताना आरोपी रमण बापु नामदास रा. मुठे चाळ, स्टेशन रोड, अमळनेर यांने फिर्यादी व त्याचा मित्र यांना चाकूचा धाक दाखवून तुमच्या खिश्यात किती पैसे आहेत, ते मला द्या नाहीतर मी तुला चाकूने मारुन टाकेल असे बोलुन त्याच्या हातातील चाकुने फिर्यादी यांचे उजव्या हाताच्या दंडावर तसेच उजव्या पायाला वार करुन जखमी केले.
तसेच फिर्यादीच्या खिश्यातील ७ हजार ८०० रुपये बळजबरीने काढून पळून गेला. या प्रकरणी अमळनेर पोलिसांत विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यांतील आरोपी नामे रमण बापु नामदास हा गुन्हा केल्यासपासून फरार झाला होता व त्याचा शोध पोलीस पथक घेत होते.
दरम्यान, पो. नि.  विजय शिंदे, अमळनेर पोलीस स्टेशन यांना आरोपी रमण बापु नामदास हा अमळनेर शहरात रेल्वेस्टेशन परीसरात लपुन बसला आहे. अशी माहिती गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पो. नि. शिंदे यांनी पोउनि विकास शिरोळे, सफौ. रामकृष्ण कुमावत, पोहेकाँ. किशोर पाटील, पोना. डॉ. शरद पाटील, पोना. दिपक माळी, पोना. रविंद्र पाटील,पोना. सिध्दांत सिसोदे, पोना. कैलास पवार अश्यांचे पथक तयार करुन आरोपीतास ताब्यात घेण्यात आले. नमुद गुन्ह्यांचा तपास सफौ. रामकृष्ण कुमावत करीत आहेत.
आरोपी रमण  याचे बाबत अमळनेर पोलीसस्टेशन कडील अभिलेख पडताळला असता त्याचेवर यापुर्वी देखील अमळनेर पोलीस स्टेशला १) गु.र.न.४३९/२०१९ भा.द.वि. कलम ३९४ प्रमाणे व २) गु.र.न.४६९/२०१९ भा.द.वि. कलम ३९४,५०६, ४२७ प्रमाणे जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.