---Advertisement---

मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात चोरट्यासह दोन मोटारसायकली जप्त, रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेची कामगिरी

---Advertisement---

येथील पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन मोटार सायकल चोरीप्रकरणी एकास अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबतचे वृत्त असे की, येथील नागझिरी मोहत्यातील शेख अकील शेख कलीम यांची हिरो होंडा कंपनीची सुपर स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक एमएच १९ सीएस ०३९२) ही रावेर-रसलपूर रोडवरील हॉटेल एसटूसमोरुन चोरीस गेली होती.

याबाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा तपास सुरू असताना गुप्त माहितीवरून सीसीटीव्ही फुटेज विश्लेषण करुन व शोध घेऊन संशयित सुशिल सुधाकर तायडे रा. स्सलपूर (ता. रावेर) यास अटक करण्यात आली. संशयिताची सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून शेख अकील यांची चोरीस गेलेली मोटार सायकल व हिरो होंडा काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल (क्रमांक एमपी ६८ एमई ५९५४) या दोन मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून हा मुद्देमाल हस्तगत केली.

पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. सिकंदर तडवी, कल्पेश आमोदकर, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी, विकारुद्दीन शेख यांच्या पथकाने कार्यवाही केली. पुढील तपास पोहेकॉ. सिकंदर तडवी हे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---