नंदुरबार : शहरातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील दंडपाणेश्वर कॉलनीतील घराचे कुलूप तोडून चोरटयांनी १ लाख १९ हजार १८० रुपयांचे सोनेचांदीचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत गुलाबसिंग बावा वसावे यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शहादा रोडवरील दंडपाणेश्वर कॉलनीतील प्लॉट नंबर २० मधील रहिवासी गुलाबसिंग बावा वसावे यांच्या घराचे कुलूप तोडुन चोरटयांनी घरातील कपाटाचे लॉकर तोडुन सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेले. यात ४ हजार २५० रुपयांचे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कॉईन, ६ हजार ९०० रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बुटी जोड, ७ हजार २०० रुपये किंमतीची ३.५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, १३ हजार २०० रुपये किमतीची ४ ग्रॅम सोन्याची अंगठी, ४४० रुपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाचे एक चांदीचे कॉईन, ८५० रुपये किं.चे १० ग्रॅम वजनाचे एक चांदीचा कॉईन, ४७ हजार ६४० रुपये किंमतीचा १७.५ ग्रॅम वजनाचा एक सोन्याचा नेकलेस, १८ हजार ७०० रुपयांचे ५ ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे कानातील पेंडल, २० हजार रुपयांची रोकड रक्कम असा एकुण १ लाख १९ हजार १८० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याबाबत गुलाबसिंग बावा वसावे यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे करीत आहेत.