इलेक्ट्रिक गाडी घेण्याचा विचार करताय, ‘ही’ गाडी अगदी कमी बजेटमध्ये!

तरुण भारत लाईव्ह । १६ जानेवारी २०२३ । सद्या इलेक्ट्रिक गाड्यांचा ट्रेन्ड सुरु आहे. जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक गाडी घेण्याचा विचार करत आहात तर तरुण भारताच्या माध्यमातून अशा एका इलेक्ट्रिक गाडी बदल माहिती जाणून घ्या, जी तुमच्या बजेटमध्ये देखील बसू शकते.

इलेक्ट्रिक गाडी वापरण्याचे फायदे
इलेक्ट्रिक गाडीला काही पेट्रोल लागत नाही, त्यामुळे पेट्रोलच्या पैशांची बचत होते. तसेच इलेक्ट्रिक गाडीमुळे प्रदूषण सुद्धा फार कमी होते. आणि इलेक्ट्रिक स्कूटर ही सहज हँडल करायला सोप्पी असते.

या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ४१ हजार ४४४ रुपये आहे. यामध्ये एकापेक्षा अनेक फीचर्स आपल्याला पहायला मिळतात. सगळ्यात पहिले आपण याच्या बॅटरी विषयी जाणून घेणार आहोत, याच्या बॅटरीला जर नॉर्मल चार्जर ने चार्ज केल्यावर याची बॅटरी फक्त ६ ते ७ तासात फुल होते. कारण या स्कूटर मध्ये ४८ V,२० AH क्षमतेचे लिथियम आयन बॅटरी दिली आहे. ही स्कूटर जर तुम्ही एकदा चार्ज केलीत तर ती तुम्हाला ६० किमी पर्यंत रायडींग देते.

या स्कूटरचे नाव आहे लोहिया ओमा स्टार. फीचर्स असे आहेत की लोहिया ओमा मध्ये डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल इंस्ट्रूमेंट कन्सोल, डिजिटल स्पीडोमीटर, पास स्विच, हॅलोजन हेडलाइट, बल्बचे टेल लाइट, बल्बचे टर्न सिग्नल लम्प, लो बॅटरी इंडिकेटर सारखे फीचर्स मिळतात. त्यासोबतच याची ब्रेकिंग सिस्टिम पण भन्नाट आहे, ते म्हणजे सस्पेंशन सिस्टममध्ये कंपनीने याच्या फ्रंट मध्ये टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि रियर मध्ये स्प्रिंग बेस्ड शॉक अब्जॉर्बर सिस्टम दिले आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला अगदी तुमच्या बजेट मध्ये मिळू शकते.