---Advertisement---

Assembly Election 2024: रावेर विधानसभा मतदारसंघांत तिसऱ्या आघाडीचा उमेदवार जाहीर ; कुणाला मिळाली संधी ?

by team
---Advertisement---


जळगाव : राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर होताच राजकीय पक्षांतर्फे उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. यात भारतीय जनता पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांचा समावेश आहे. या पक्षांसोबतच परिवर्तन महाशक्ती अर्थात तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत आठ जणांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल रावेर विधानसभा मतदार संघातील उमेदवाराचे नावं जाहीर करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात यावल -रावेर विधानसभा मतदार संघातून प्रहार जनशक्ती पक्षाने अनिल चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर त्यांच्या विरोधात भाजपाकडून माजी खासदार स्व. हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे हे उमेदवार मैदानात आहेत. तर काँग्रेसने अद्याप या मतदार संघासाठी आपल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा केलेली नाही. अनिल चौधरी यांच्या उमेदवारीने यावल–रावेर विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत रंगणार आहे.

तिसऱ्या आघाडीत प्रहार जनशक्ती पक्षाचे 4, महाराष्ट्र राज्य समितीला 2, स्वतंत्र भारत पक्षाचा 1, स्वाभीमानी शेतकरी पक्षाचा 1 असे एकूण 8 जणांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

प्रहार जनशक्ती पक्ष – 4

अनिल छबिलदास चौधरी – (रावेर यावल)

गणेश रमेश निंबाळकर -(चांदवड)

ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू – (अचलपूर)

सुभाष साबणे – (देगलूर बिलोली -SC)

स्वतंत्र भारत पक्ष – 1

वामनराव चटप – (राजुरा)

महाराष्ट्र राज्य समिती – 1

गोविंदराव सयाजीराव भवर – (हिंगोली)

स्वराज्य पक्ष – 2

अंकुश सखाराम कदम – (ऐरोली)

माधव दादाराव देवसरकर -(हदगाव हिमायतनगर)

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment