‘या’ ऑलराउडरने… निवृत्तीचा निर्णय घेतला!

दक्षिण आफ्रिकेचा ऑलराउंडर ड्वेन प्रिटोरियसने टी 20 आणि अन्य लहान झटपट स्वरुपातील क्रिकेटवर लक्ष देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीचा निर्णय घेतलाय. प्रिटोरियसने 2016 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पदार्पण केलं होतं. प्रिटोरियसने आतापर्यंत 30 टी 20, 27 वनडे आणि 3 कसोटी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे.

प्रिटोरियसने पाकिस्तान विरुद्ध 2021 मध्ये 17 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या. प्रिटोरियस यासह दक्षिण आफ्रिकेकडून टी 20 क्रिकेटमध्ये सर्वोतकृष्ट गोलंदाजीचा विक्रम आपल्या नावावर केला होता.

प्रिटोरियस म्हणाला
“मी काही दिवसांपूर्वी क्रिकेट कारकीर्दीतील अनेक महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी प्रतिक्रिया प्रिटोरियसने आफ्रिकेकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

“मी आता माझ्या कारकीर्दीत टी 20 आणि इतर छोट्या प्रकारात लक्ष केंद्रीत करेन. दक्षिण आफ्रिकेसाठी खेळणं हे माझ्या जीवनाचं एकमेव उद्दिष्ट होतं”, असं प्रिटोरियस म्हणाला.