ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री तब्बल 24 वर्षानंतर परतली भारतात

#image_title

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीही 90 च्या दशकातील सर्वात सुंदर नायिका म्हणून ओळखली जायची. त्यावेळी तिने तिच्या सौंदर्याच्या जोरावर खूप लोकप्रियता मिळवली होती. यादरम्यान अभिनेत्री अनेक वादातही अडकली होती.एके काळी आपल्या अभिनयाने तरूणांना वेड लावणारी अभिनेत्री आज 24 वर्षांनंतर मुंबईत परतली. काही वर्षांपूर्वी याच अभिनेत्रीचे नाव 2000 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात आले होते. त्यानंतर तिच्या करिअरला उतरती कळा लागली होती.

ममता कुलकर्णीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक सेल्फी व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ती “हाय मित्रांनो, मी ममता कुलकर्णी आहे आणि मी 25 वर्षांनंतर भारतात, बॉम्बे, मुंबई, आमची, मुंबईला आले आहे” असे म्हणतांना दिसत आहे.

अभिनेत्री पुढे म्हणते, “आणि मी खरोखर खूप आनंदी आहे आणि ते कसे व्यक्त करावे हे मला कळत नाही. मी भावनिक आहे. वास्तविक, जेव्हा फ्लाइट लँड होत होते तेंव्हा मी माझ्या डावी-उजवीकडे पाहत होतो. आणि मी 24 वर्षांनी माझा देश पाहिला आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मी खूप भारावून गेली आहे. मात्र, भारतात परतण्याचे कारण काय, याचा खुलासा ममताने केला नाही.

राम लखन, वक्त हमारा है, क्रांतिवीर, करण अर्जुन, सबसे बडा खिलाडी, आंदोलन आणि बाजी यांसारख्या बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या चित्रपटांमध्ये ममताने काम केले आहे. तिचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट 2002 मध्ये प्रदर्शित झाला.

2000 कोटींच्या ड्रग्ज प्रकरण
ममता कुलकर्णी ही अभिनेत्री कधीकाळची प्रसिद्ध अभिनेत्र्‍यांपैकी एक होती. तिला चित्रपटात घेण्यासाठी दिग्दर्शक आतूर असायचे. मात्र 2016 नंतर तिच्या करिअरला उतरती कळा लागली. 2016 मध्ये ठाणे पोलिसांनी 2000 कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटच्या प्रकरणात ममता कुलकर्णीला आरोपी केले होते.2016 मध्ये ममताचे नाव 2000 कोटी रुपयांच्या  संशयितांमध्ये सामील होते. यानंतर अभिनेत्रीचे करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. मात्र, तिने नेहमीच आपल्यावरील हे आरोप निराधार असल्याचे  म्हटले होते. या सर्व गोष्टींचा तिच्या करिअरवर खूप वाईट परिणाम झाला. आपल्या कारकिर्दीतील वाढत्या अडचणी पाहून ममता चित्रपट जगतापासून दुरावली.