---Advertisement---

बापरे ! लक्झरियस कार पेक्षा महाग आहे ‘ही’ हॅन्ड बॅग, किंमत ऐकून व्हाल थक्क

---Advertisement---

भारतीय रस्ते, संस्कृती, स्थानिक कारागिरीतून प्रेरणा घेत प्रसिद्ध संगीत कलाकार आणि डिझायनर फॅरेल विल्यम्स यांनी अनोखी बॅग बनविली आहे. या बॅगने जगभरात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. बॅग म्हटले की मुली-महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. यात फॅरेल विल्यम्स याने लुई व्हिटॉनच्या क्लासिक मोनोग्राम कॅनव्हासमध्ये बनविलेली बॅगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही बॅग भारतीय ऑटो रिक्षाच्या आकारात डिझाईन करण्यात आली आहे. या बॅगला लहान चाके आणि उंटाच्या रंगाचे चामड्याचे हँडल देखील लावण्यात आले आहे. हि भारतीय ऑटो रिक्षा बॅग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फ्रेंच लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनने त्यांच्या पुरुषांच्या स्प्रिंग समर 2026 कलेक्शनमध्ये एक अनोखी बॅग लाँच केली आहे. ही बॅग भारतीय ऑटो रिक्षाप्रमाणे बनविण्यात आलेली ही बॅग सोशल मीडियावर ट्रेंड करीत आहे. तिची सर्वत्र चर्चा होतांना दिसते आहे. या रिक्षाचा व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध स्वरूपाच्या तसेच गंमतीशीर कॉमेंट दिल्या आहेत.

---Advertisement---

भारताला केंद्रस्थानी ठेवून फॅरेल विल्यम्स यांच्या नेतृत्वाखाली कलेक्शन बनविण्यात आले आहे. यातून भारतीय संस्कृतीचा एकप्रकारे सन्मान करण्यात आला आहे यात देशातील स्वदेशी कारागिरीपासून प्रेरणा घेऊन डिझाइन्सचा समावेश करण्यात आला होता. फ्रेंच लक्झरी फॅशन हाऊस ऑटोरिक्षासारख्या आकाराच्या त्याच्या अनोख्या हँडबॅगसाठी प्रसिद्धी मिळवत आहे. हे भारतीय स्ट्रीट संस्कृती आणि लक्झरी यांचे एक मिश्रण आहे.

लुई व्हिटॉन ब्रॅंडने यापूर्वी विमाने, डॉल्फिन आणि अगदी लॉबस्टरच्या आकारात सुद्धा बॅग तयार केल्या आहेत. तयार करण्यात आलेली ऑटोरिक्षा हँडबॅग भारतीय रस्त्यावरील संस्कृतीला एक खेळकर आवाज देत वेगळी दिसते. ही मजेदार निर्मिती ब्रँडकडून अशा किंमतीसह आणली जाण्याची अपेक्षा आहे की ज्यामुळे भावूक होऊन जाईल, परंतु त्याचे खरे मूल्य केवळ त्याच्या ब्रँड नावातच नाही तर त्याच्या संकल्पनेत आणि कारागिरीत देखील आहे. तयार करण्यात आलेल्या बॅगची किंमत जवळपास 35 लाख असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---