या मुळे होतोय मणिपूरात हिंसाचार…

इम्फाळ, २९ : मणिपूरमध्ये होणाऱ्या  हिंसाचारामागे राजकारण  असल्याचे सांगितले जात असले तरी, यामागे मादक पदार्थंची भूमिकाही  तस्करांची असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मणिपुरातील काही जिल्ह्यांवर म्यानमार, थायलंड आणि लाओसमधील • मोठ्या तस्करांचे वर्चस्व आहे. आहे. म्यानमार,थायलंड, लाओस गोल्डन ट्रँगल मध्ये होणाऱ्या तस्करीची मोठी खेप मणिपुरातील भारत -म्यानमार सीमेवरून पुढे पोहचवली जाते. अशी माहिती मादक पदार्थ नियंत्रण विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. मणिपूरातील भोगोलिक आणि आर्थिक परिस्थिती मुळे म्यानमार थायलंड आणि लाओसमधील मादक पदार्थांच्या अवैध व्यापार येथे स्वस्थ कामगार आणि चांगली जमीन उपलब्ध होत आहे

दक्षिण आशियातील या  मादकपदार्थांच्या तस्करांना मेक्सिकोतील मोठ्या तस्करांचाही पाठिंबा असल्याचे सांगितले जात  आहे . मणिपूर आणि  म्यानमारमधील अफू ही दर्जाच्या बाबतीत पहिल्या तीन क्रमांकावर असते. यावर प्रक्रिया करून आंतरराष्ट्रीय बाजारात हेरॉईन विकले जाते. सध्या मणिपुरात वापरल्या जाणाऱ्या जमिनीवरील सर्वाधिक ताबा  कुकी चिनी समुदायातील लोकांचा आहे. त्यामुळे नवीन समीकरणांमध्ये जमिनीच्या दावेदारीवर या  समुदायाचा  अधिकार कमी  झाल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते,

तर वाढेल हिंसाचार… 

स्थानिकांसोबत म्यानमारचे तस्कर अफूचा अवैध व्यवसाय करतात. नवीन व्यवस्थेप्रमाणे नागा आणि कुकी समुदायाच्या जमिनींचा हिस्सा मतैई समाजाला मिळण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर मणिपुरातील हिंसाचार वाढेल. म्यानमारच्या मागून चीन आपल्या चाली खेळत असल्याचेही समजले आहे.