‘या’ चित्रपटाची क्रेझ, चक्क कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर

मेगास्टार रजनीकांत यांच्या चित्रपटांची दक्षिण भारतातील क्रेझ सर्वांनाच माहीत आहे. त्यांचे चित्रपट प्रदर्शित होणे हे एखाद्या सणासुदीपेक्षा कमी नाही. त्यामुळेच चेन्नई-बेंगळुरूमधील अनेक कंपन्यांनी रजनीकांत यांच्या आगामी ‘जेलर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेला सुट्टी जाहीर केली आहे.

रजनीकांत स्टारर ‘जेलर’ हा चित्रपट 10 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. तब्बल 2 वर्षांनी हा मेगास्टार पुन्हा मोठ्या पडद्यावर येत आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर आहे.

ज्यामध्ये जॅकी श्रॉफ, रम्या कृष्णन, तमन्ना आणि विनायकन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची आगाऊ बुकिंगही चांगली होत असून, चित्रपटाला बंपर ओपनिंग मिळणार आहे. साऊथमध्ये या चित्रपटाला 90 टक्क्यांहून अधिक स्क्रीन मिळतील अशी अपेक्षा आहे.ऑगस्टलाच सुट्टी जाहीर केली आहे. चेन्नईस्थित कंपनी ‘UNO Aqua Care’ ने चेन्नई, बेंगळुरू, त्रिची, तिरुनेलवेली, चेंगलपट्टू, मट्टुथवानी, अरपलायम आणि अलगप्पन नगर येथे आपल्या शाखांना चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी सुट्टी म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे.

10 ऑगस्टला रजेच्या अर्जांची संख्या जास्त असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीने म्हटले आहे की, ते आपल्या कर्मचार्‍यांना विनामूल्य चित्रपट तिकिटे देऊन पायरसीविरोधी उपायांना समर्थन देण्यासाठी पावले उचलत आहेत. रजनीकांत हे एक दिग्गज सुपरस्टार आहेत ज्यांचे अनेक पिढ्यांच्या हृदयात विशेष स्थान आहे.