जळगाव : जिल्ह्यातील मुक्ताईनगर शहरातील लक्ष्मीनारायण प्रोविजन किराणा दुकान बंद करत असताना, 19 डिसेंबर रोजी पाळत ठेवून असलेल्या पाच जणांनी चाकूने वार करून 10 हजार रुपये रोख रक्कम हिसकावली. या घटनेत मंगेश खेवलकर जखमी झाले होते. . या प्रकरणी पोलिसांनी भुसावळच्या पाच जणांच्या टोळीला एलसीबी आणि मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रारंभिक तपासात, प्रेम उर्फ गोपी अनिल धामणे (भुसावळ) याच्यावर संशय होता. त्यानंतर, पथकाने त्याला ताब्यात घेतले आणि चौकशी केल्यानंतर अन्य आरोपींची नावे उघडकीस आली: रोहीत उर्फ दादु संजय नवघीरे, रिहान शहा करीम शहा, मिशन रफिक शेख, आणि कुंदन अनिल पठाळे (सर्व भुसावळ आणि जाममोहल्ला येथील निवासी). त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून गावठी कट्टा, 4 मोबाईल फोन, बुलेट आणि एक दुचाकी तसेच फिर्यादीकडून हिसकावलेले 10 हजार रुपये रोख जप्त करण्यात आले. या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
तपासामध्ये जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर आणि एलसीबी पोलिसांनी एकत्रितपणे कार्यवाही केली.
यांनी केली कारवाई
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या पथकातील सपोनि राजेंद्र चाटे, सपोनि जयेश पाटील, पोना महेंद्र सुरवाडे, पोना सुरेश मेढे, पोकॉ गोविंदा पवार, सुनिल मोरे मुक्ताईनगर पोलीस स्टेशन, एलसीबीचे पोउपनिरी शरद बागल, हवालदार कमलाकर बागुल, गजानन देशमुख, गोपाल गव्हाळे, संघपाल तायडे, श्रीकृष्ण देशमुख, सचिन पोळ, महेश सोमवंशी अशांनी कारवाई केली आहे.