प्रति पंढरपूर निमझरी येथे आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी घेतले दर्शन

शिरपूर : तालुक्यातील प्रति पंढरपूर निमझरी येथे आषाढी एकादशी निमित्त 17 जुलै 2024 रोजी दरवर्षा प्रमाणे भव्य यात्रा व धार्मिक कार्यक्रमांचा हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. आमदार काशिराम दादा पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व मान्यवरांच्या हस्ते मंदिरात  महाआरती करण्यात आली.

श्री विठ्ठल रुक्मिणी माऊली दर्शन सोहळा आषाढी एकादशीच्या दिवशी अखंडपणे सुरू होता. पहाटे 5 वाजता काकड आरती, सकाळी 7.30 वाजता पांडुरंगाची महापूजा, सकाळी 9 वाजता महाआरती, सायकांळी 6 वाजता हरिपाठ, रात्रभर भजनी मंडळी तर्फे जागरणाचा कार्यक्रम, दुसऱ्या दिवशी सकाळी काल्याचा कार्यक्रम झाला.

शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, शिरपूरचे माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, तहसीलदार महेंद्र माळी, पोलीस निरीक्षक के.के.पाटील, शिरपूर वरवाडे नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, अधिकारी, कर्मचारी, शिरपूर शहर व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला, पुरुष भाविक, युवावर्ग यांनी अतिशय उत्साहात धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाचा लाभ घेतला.

मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष माजी पं.स.सदस्य छगन गोरख गुजर, सर्व ग्रामस्थ यांनी सुंदररित्या नियोजन करून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.