जळगाव : व्यावसायिकाला अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत खंडणीची मागणी करणाऱ्या महिलेसह एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील एका भागात एक ५५ वर्षीय व्यावसायिक आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. त्याचा हॉटेल व्याव्सायिक्सोबत ओळख होती. या हॉटेल मालक संशयित आरोपी वकील उखा राठोड (वय ३०, रा. रामदेववाडी ता. जळगाव) यांनी जुलै महिन्यामध्ये एका ३८ वर्षीय वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेची ओळख करून दिली होती. या व्यावसायिकाने ३००० रुपये देत महिलेसोबत सहमतीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. यानंतर वेळोवेळी पैसे दिलेत.
व्यावसायिकाने महिलेला रोखीने १० हजार ५०० व ऑनलाईन पद्धतीने ६१ हजार रुपये दिले. तसेच वकील राठोड याला १५ हजार रुपये दिले. ही महिला काही दिवसांपासून व्यावसायिकाकडे ५ लाखांची मागणी करत होती. तसेच ही मागणी फेटाळली तर माझ्यावर व माझ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची खोटा तक्रार पोलिसात देईल अशी धमकी दिली. यामुळे या व्यवसायिकाने शनिवार ७ सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.
यानुसार पोलिसांनी शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास सापळा रचला. सदरहू महिलेला फिर्यादी व्यावसायिकाने ४ लाख रुपयांचा चेक आणि १ लाख रुपये कॅश दिल्यानंतर पोलिसांनी महिलेसह वकील राठोड याला ताब्यात घेऊन अटक केली. त्यांची दुचाकी देखील जप्त केली आहे. संबंधित व्यवसायिकाने फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.