---Advertisement---

Cyber Crime : डिजिटल अरेस्टची धमकी; फसवणूक झालेल्या वृद्धाने थेट शेतीच काढली विक्रीला

by team
---Advertisement---

Cyber Crime :  सध्या देशासह राज्यात डिजिटल अरेस्टचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे अनेक प्रकरणे आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून स्कॅम फोन कॉल्स, खोटी वेब साइट्स, आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून फसवणूक केली जाते. याबाबत केंद्र सरकारकडून अनेक उपाय योजना देखील केल्या गेल्या आहेत.

दरम्यान, बुलढाण्यातील एका वृद्धाची डिजिटल अरेस्टचा नावाखाली  २८ लाख ५० हजार रुपयात फसवणूक केल्याचे घटना उघडकीस आली आहे. काही दिवसांपुर्वी त्यांना मुंबई क्राईम ब्रँचकडून बोलत असल्याचा फोन आला होता. यात तुम्ही एका प्रतिष्टीत व्यक्तीला तुमच्या फोन वरून अश्लील फोटोग्राफ्स पाठविले आहेत. त्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी बतावणी करत गुन्हेगारांनी त्यांना  २८ लाख ५० हजार रुपयात गंडवले.

हेही वाचा : ऐकावं ते नवलचं! आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ, सोनोग्राफी रिपोर्टने डॉक्टरही थक्क

यानंतर पुन्हा त्याच्याकडे ६० लाख रुपयाची मागणी केली होती. पण त्यांच्याकडे एवढी रक्कम नसल्याने त्यांनी स्वतःची शेती विक्रीसाठी काढली. मात्र सायबर पोलिसांच्या सूचकतेने वृद्धाची रक्कम सुरक्षित राहिली आहे.

दरम्यान त्या वृद्धला सायबर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असता वृद्धाला विश्वासात घेऊन विचारणा केली. तेव्हा त्याने घडलेल्या सर्व प्रकारची माहिती सांगितली. त्यानुसार सायबर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून पोलिसांनी संबंधितांचे खाते गोठवले व त्या वृद्धाचे २२ लाख ५० हजार वाचविले. यापूर्वी सुद्धा बुलढाणा जिल्ह्यात असे डिजिटल अरेस्टचे प्रकार वाढले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन ठाणेदार शिरीष खंडारे यांनी  केले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment