---Advertisement---
मंगळवारी रात्री एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना फोन करुन कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी दिली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. यानंतर पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने तात्काळ रेल्वे स्थानकावर धाव घेत बॉम्बचा शोध घेतला. यामुळे रेल्वे स्थानकात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
रेल्वे पोलिसांच्या श्वान पथकाने संपूर्ण रेल्वे प्लॅटफॉर्म, रेल्वे रुळ, प्लॅटफॉर्मवरील प्रत्येक रुम आणि एक्सप्रेसची पाहणी केली. त्यानंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जात आहे.
या माहितीमुळे पोलिसांच्या यंत्रणांनी तत्काळ कृती सुरू केली. रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस यंत्रणांनी तातडीने कल्याण रेल्वे स्टेशन परिसराची तपासणी केली. सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आणि अनेक तास तपासणी मोहीम राबविण्यात आली. मात्र, तपासणीदरम्यान बॉम्बचा कोणताही मागमूस सापडला नाही. या घटनेमुळे अफवा असल्याचे सिद्ध झाले.
या प्रकरणाचा तपास सुरू असून फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जात आहे. अशा धोकादायक अफवांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सध्या कल्याण रेल्वे स्टेशनवरील परिस्थिती नियंत्रणात आहे. आम्ही या आलेल्या कॉलचा तपास करत आहोत. यानंतर आता पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.









