राष्ट्रवादीचे माजी नेते बाबा सिद्दकी यांची दसऱ्याच्या दिवशी रात्री भर रस्त्यात गोळ्या झाळून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली आहे. बाबा सिद्दकी हे सलमान खानचे निकटवर्तीय होते. त्यामुळे या हत्येचे कारण सिद्दकी यांचे सलमानसोबतचे चांगले संबंध असल्याचं बिश्नोई टोळीने सांगितले आहे. यानंतर पुन्हा एकदा सलमान याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर सलमान खानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर आता सलमान खान आहे. यामुळे सलमानने स्वतःच्या सुरक्षेसाठी 2 कोटी रुपयांची बुलेट प्रुफ कार खरेदी केली आहे. सलमानने बुलेट प्रूफ असलेली नवी निसान पेट्रोल एसयूव्ही खरेदी केली आहे. अभिनेत्याकडे आधीच लँड क्रूझर आणि निसान पेट्रोल होते. आता सुरक्षेच्या कारणास्तव त्याने ही तिसरी कार खरेदी केली आहे.
सलमान खानच्या नव्या बुलेट प्रूफ कारची किंमत 2 कोटी रुपये आहे. आधीच्या कारप्रमाणेच सलमान खानने नवी कार दुबईहून आयात केली आहे. सलमानचे मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची नुकतीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. लॉरेन्स बिश्नोईने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आणि बाबा सिद्दिकीची सलमानसोबतची मैत्री हे कारण सांगितले.
सलमान खानला पुन्हा मिळाली धमकी
धमकीसह बिश्नोई गँगने भांडण संपवण्यासाठी सलमान खान याच्याकडे तब्बल 5 कोटी रुपयांची मागणी केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानला 5 कोटी रुपये देण्याची मागणी करणारा धमकीचा संदेश मुंबई वाहतूक पोलिसांना मिळाला आहे. धमकी देणारा लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा दावा केला जात आहे.
जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानचे नशीब माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यापेक्षा वाईट होईल…. अशी धमकी अभिनेत्याला देण्यात आली आहे. सध्या सलमान खानला धमकी मिळालेल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
सलमानला पुन्हा धमकी, स्वतःच्या सुरक्षेसाठी केले २ कोटी खर्च
by team
Published On: ऑक्टोबर 19, 2024 11:51 am

---Advertisement---