HMPV Healthy Diet : HMPV व्हायरसचा धोका वाढला; भारतात आढळले तीन रुग्ण

#image_title

HMPV : कोरोना महामारीनंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) वेगाने पसरत असून भारतात देखील या व्हायरसची लागण झालेल्या तीन रुग्णांची नोंद झाली आहे.

कर्नाटकमध्ये सुरुवातीला दोन रुग्ण आढळले होते, तर आता गुजरातमध्ये एका 2 वर्षाच्या मुलात HMPV व्हायरस सापडला आहे. अहमदाबादच्या चांदखेडा परिसरातील एका खासगी रुग्णालयात संबंधित मुलाला दाखल करण्यात आले आहे.

HMPV व्हायरसपासून बचावासाठी सल्ला

सावधगिरी बाळगा : खोकला किंवा शिंका येताना तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
हात नियमितपणे साबण आणि पाण्याने धुवा किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझर वापरा.
ताप, खोकला आणि शिंका असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक आहार घ्या.
वायुविजन (व्हेंटीलेशन) सुनिश्चित करा.

हे करू नका

हस्तांदोलन टाळा.
टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करू नका.
आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळा.
डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नका.

HMPV म्हणजे काय ?

ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) हा एक श्वसन विषाणू असून, त्याची लक्षणे सामान्य सर्दी आणि फ्लूसारखी असतात. सामान्यतः घसा खवखवणे, खोकला, नाक वाहणे यांसारखी लक्षणे दिसतात. लहान मुले, वृद्ध, तसेच कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींमध्ये हा विषाणू गंभीर आजार घडवतो.

HMPV आणि कोविड-19 यामध्ये साम्य काय?

एचएमपीव्ही आणि कोविड-19 हे वेगळ्या व्हायरल कुटुंबातील असले तरी, दोघेही मानवी श्वसन प्रणालीला लक्ष्य करतात. दोन्ही विषाणू श्वसन थेंबांद्वारे आणि दूषित पृष्ठभागांच्या संपर्काने पसरतात. ताप, खोकला, घसा खवखवणे, आणि श्वास लागणे ही दोन्ही विषाणूंची समान लक्षणे आहेत.

सतर्कतेचा इशारा

चीनमधील श्वसन आजारांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातही आरोग्य यंत्रणा हायअलर्टवर असून, सध्याच्या स्थितीत श्वसन आजारांमध्ये कोणतीही मोठी वाढ झालेली नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. तरीही संभाव्य धोका लक्षात घेऊन खबरदारी घेतली जात आहे.