Amazon : भारतातील तीन महत्वाच्या सेवा होणार बंद, जाणून घ्या कारण..

तरुण भारत लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२२ । ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज अमेरिकन कंपनी अमेझॉनं भारतातील आपले तीन बिझनेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणत्या सेवा? 
बंगळुरुमध्ये ही सेवा पायलट प्रोजेक्ट म्हणून सन २०२० मध्ये भारतात सुरु झाली होती. ही सेवा २९ डिसेंबर २०२२ पासून बंद होणार आहे. त्याचबरोबर अमेझॉन आपली एज्युटेक कंपनी असलेली अमेझॉन अकेडमी ही सेवा देखील ऑगस्ट २०२३ पासून बंद करणार आहे. अमेझॉन एकॅडमी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म खास इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केला होता, जे JEE सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत.

दरम्यान, अमेझॉननं नुकतेच जगभरातील आपल्या १०,००० कर्मचाऱ्यांना कायमची सुट्टी दिली. कंपनीचे सीईओ अँडी जेस्सी यांनी आपल्या अधिकृत निवेदनात म्हटलं की, येत्या काही महिन्यांमध्ये आणखी कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. पण या कर्मचाऱ्यांना थेट काढून टाकण्यात येणार नाही. या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या टीमसोबत काही आठवड्यांसाठी काम करण्याची संधी देणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना VSP योजनेंतर्गत स्वेच्छेनं राजीनामा देण्यास सांगण्यात येणार आहे. जे कर्मचारी VSP योजनेंतर्गत राजीनामा देतील त्यांना २२ आठवड्यांचं बेसिक पगार मिळेल. पुढील सहा महिने ते बावीस आठवडे एका आठवड्याचा बेसिक पगार मिळेल. तसेच वीम्याचा लाभही देण्यात येईल.

या सेवा बंद करताय? 
जगभरात सध्या आर्थिक मंदीच प्रमाण वाढत असून याचाच परिणाम म्हणून अनेक बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीचा सपाटाच लावला आहे. त्यातच आता ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज अमेरिकन कंपनी अमेझॉनं भारतातील आपले तीन बिझनेस बंद करण्याचा निर्णय घेतला.