इमारतीला लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू ; आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

मुंबई : मुंबईतील अंधेरीमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. या परिसरातील रिया पॅलेस इमारतीत आज सकाळी मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास इमारतीच्या दहाव्या मजल्यावर आग लागली. या आगीमध्ये एकाच घरातील तीन जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

याबात अधिक माहिती अशी कि, अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला कॉम्प्लेक्स जवळ रिया पॅलेस नावाची 14 मजली इमारत आहे. बुधवारी सकाळी या इमारतीच्या 10 व्या मजल्यावरील एका रहिवासी फ्लॅटला अचानक भीषण आग लागली. आगीचा माहिती मिळताच अग्निशमन दलाचा 5 गाड्या घटनास्थळ दाखल होऊन तब्बल एका तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या फायर कूलिंग चे काम अग्निशमन दलाचा जवानांकडून सुरू आहे. आगीची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नांती आग विझवण्यात आली. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र पहाटे लागलेल्या या आगीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लागलेल्या आगीमुळे एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाला. कांता सोनी( वय 71 ) चंद्रप्रकाश सोनी (वय 76), आणि पेलूबेटा ( वय 42) असे मृतांचे नाव आहे.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आगीमुळे इमारतीच्या इतर भागांमध्ये पसरू नये यासाठी अग्निशमन दलाने वेळीच हस्तक्षेप केला आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू असून, इमारतीत आणखी कोणी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.