---Advertisement---

तीन मजली इमारत अचानक कोसळली,अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली…

by team
---Advertisement---

डोंबिवली:  तीन मजली इमारत कोसळून नुकतीच एक दुर्दवी घटना घडली आहे, डोंबवली पूर्वेतील आयरे-दत्तनगर परिसरातील आदिनारायण नावाची इमारत कोसळली आहे. या ढिगाऱ्याखाली अनेक कुटुंब अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. आता नुकतीच डोंबिवलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे.  आदिनारायण सोसायटीची ही इमारत जुनी झाली होती.कालच कल्याण-डोंबिवली महापालिकेने या इमारती मध्ये राहणाऱ्या लोकांना कालच दुसरीकडे स्थलांतरीत होण्याची नोटीस दिली  होती.

आणि आज इमारत कोसळून ही दुर्दवी घटना घडली आहे. केडीएमसीच्या नोटीसनंतर काही कुटुंबानी सुरक्षितस्थळी जाण्याचा निर्णय घेतला. तर अनेक कुटुंब अजूनही या इमारतीत वास्तव्यास होते. याशिवाय कल्याण डोंबिवलीत काल रात्री आणि आज सकाळीदेखील पाऊस सुरु होता. या दरम्यान ही इमारत कोसळली आहे. या घटनेत अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाकडून बचावाचं कार्य युद्ध पातळीवर सुरु झालं. बचाव पथकाकडून ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरु आहे. नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

 

 

 

 

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment