धुळपिंप्री येथे शिवराज्यभिषेक दिनाला तिलांजली, ग्रा. प. सदस्या मनीषा पाटील यांची बिडीओकडे तक्रार

पारोळा  :  तालुक्यातील धुळपिंप्री येथे शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करण्यात आला नाही. हा सोहळा साजरा न करणाऱ्या ग्रामसेवक व सरपंच यांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी धुळपिंप्री ग्रामपंचायत सदस्य मनीषा मिलिंद पाटील यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भातील लेखी तक्रार पारोळा गटविकास अधिकरी यांच्याकडे सोमवार १० जून रोजी केली आहे.

ग्रामपंचायत सदस्य मनीषा पाटील यांनी तक्रारीत म्हंटले आहे की,  धुळपिंप्री येथे शासन परिपत्रकानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करणे आवश्यक होते. हा सोहळा कोणत्या कारणांमुळे साजरा करण्यात आला नाही ? असा प्रश्न ग्रामपंचायत सदस्य मनीषा पाटील यांनी उपस्थतीत केला आहे. हा सोहळा साजरा का करण्यात आला नाही याचा खुलासा करण्यात यावा. राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत शासनाच्या परिपत्रकानुसार शिवराज्यभिषेक सोहळा साजरा करणे आवश्यक होते. मात्र, या शासन आदेशाला ग्रामसेवक व सरपंच यांनी केराची टोपली दाखवली आहे. यातून राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाला आहे. या सर्व बाबींची सखोल चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून शासन निर्णयानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.