तुमची छुपा कॅमेऱ्याने कोणी रेकॉर्डिंग तर करत नाहीना? असा शोधा Spy Camera

Spy Camera : हल्ली छुप्या कॅमेऱ्याने शुटिंग करत ब्लॅकमेल करण्याच्या घटना सातत्याने घडत आहे. हॉटेलच्या खोलीत छुपा कॅमेऱ्याने कपलचे वैयक्तिक क्षण रेकॉर्ड करत ब्लॅकमेल केल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो. हे छुपे कॅमेरे सहसा हॉटेलमधील बाथरूमच्या आरशात किंवा बल्बमध्ये लपलेले असतात. कधी कधी तुमच्या खोलीत कॅमेरा आहे की नाही? हे समजतच नाही आणी रेकॉर्डींग होत तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं. असा प्रसंग आपल्यावर ओढावू नये असे वाटत असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. या लेखात आपण एखाद्या खोलीत Spy Camera आहे की नाही? हे कसं शोधावं जाणून घेऊया.

समाजासाठी Spy Camera च्या माध्यामातून रेकॉर्डिगच्या घटना नवीन नाहीत. अशा अनेक घटना घडत असतात. तुमच्या सोबत असे होऊ नये यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. अशा काही काही टिप्स फॉलो करुन तुम्ही कोणताही Spy Camera अगदी सहज शोधू शकता आणि स्वतःची होणारी फसवणूक टाळू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्ही ज्या रुममध्ये आहात त्याची व्यवस्थित पाहणी करा.

हेही वाचा : दारूच्या नशेत पत्नीची वेगळीच मागणी, नकार दिल्याने पतीला दिला बेदम चोप!

या ठिकाणी असू शकतो कॅमेरा
सामान्यतः स्पाय कॅमेरा कोणाच्या लक्षात येवू नये यासाठी तो अशा ठिकाणी लावला जातो. ज्या ठिकाणी कोणाचे लक्ष सहजासहजी जात नाही. यात सामान्यतः स्पाय कॅमेरा हा सॉफ्ट टॉय, शोकेस, फ्लॉवर पॉट, घड्याळ, बल्ब, स्मोक डिटेक्टर आणि एसीमध्ये Spy Camera लपवलेला असतो. त्या ठिकाणी विशेष लक्ष द्यावे.  

त्यानुसार, तुम्ही ही ठिकाणे नीट तपासावीत. या ठिकाणी Spy Camera असल्यास त्या कॅमेऱ्यातून काही प्रकाश येताना दिसेल, हा प्रकाश रिफ्लेक्ट होतो.

फ्लॅश लाइट
तुम्ही आहे त्या ठिकाणी स्पाय कॅमेरा आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही खोलीत अंधार करत फ्लॅश लाइटने फोकस करावा. यामुळे तुम्हाला स्पाय कॅमेऱ्यातून रिफ्लेक्शन दिसेल. जे स्पाय कॅमेऱ्यातून होणाऱ्या रेकॉर्डींगपासून तुमचे संरक्षण करेल.  

वाय-फाय नेटवर्कवरुन ही लक्षात येतो स्पाय कॅमेरा
हल्लीचं युग हे इंटरनेटचं युग मानलं जातं. बऱ्याचशा गोष्टी या इंटरनेटच्या सहाय्याने ऑपरेट होतात. अशात तुम्ही एखाद्या हॉटेलच्या खोलीत असाल आणि तुम्हाला जवळपास कोणतेही अनोळखी वाय-फाय नेटवर्क दिसल्यास ते स्पाय कॅमेऱ्याचे असू शकते. काही कॅमेरे मेमरी कार्डसह येतात. त्यांना वाय-फायची आवश्यकता नसते, यावरुन तुम्ही सावध झाले पाहिजे. 

लाल किंवा हिरवा एलईडी लाइट
स्पाय कॅमेऱ्याची निर्मिती अशा पद्धतीने केली असते की, त्यात काही एलईडी लाईट असतात. लाल किंवा हिरव्या रंगाचे हे एलईडी लाईट असतात. या एलईडी लाईट्सवरुन Spy Camera आहे की नाही ते ओळखता येवू शकते. या पद्धतीने तुम्ही कोणताही स्पाय कॅमेरा सहज शोधू शकता.

ॲप्स वापरा
वरील सर्वा उपायांसह तुम्ही अजून एक उपाय स्पाय कॅमेरा शोधण्यासाठी करु शकता. तो म्हणजे मोबाईल अॅपचा वापर. Spy Camera शोधण्यासाठी तुम्ही काही खास मोबाईल ॲप्स वापरू शकता. असे अनेक ॲप्स आहेत जे तुम्हाला छुपा कॅमेरा शोधण्यात मदत करतात.