सोयगाव : घरगुती हिंसाचारातून महिलांच्या शाररिक व मानसिक त्रासांत वाढ झाली आहे. या जाचाला कंटाळून महिला ह्या टोकाचे पाऊल उचलतांना दिसतात. अशाच प्रकारे सासरच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी सोयगाव तालुक्यातील वरठाण येथे घडली.
पतीकडून वारंवार होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन केलेल्या आत्महत्याप्रकरणी शुक्रवारी रात्री बारा वाजता तिच्या पतीस अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता सोयगावच्या न्यायालयाने त्याची हर्सलला रवानगी करण्यात आली आहे.
पूजा सोपान संसारे (वय २७) असे गळफास घेऊन मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. गुरुवारी रात्री विवाहितेने पतीकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून गुरुवारी रात्री वरठाण येथे राहत्या घरी पंख्याला दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. दरम्यान, पूजा संसारे हिचे पोलीस बंदोबस्तात अंत्यसंसकार करण्यात आले.
याप्रकरणी पती सोपान पीतांबर संसारे व अन्य एक अशा दोघांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने पती सोपान संसारे (वय ३३) यास शुक्रवारी रात्री बारा वाजता अटक केली. दरम्यान, पूजाचे बनोटी येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून सायंकाळी सहा वाजता पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत पूजा संसारेच्या पश्चात पती, दोन मुली, दोन मुले असा परिवार आहे.
याप्रकरणी सोयगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रजाक शेख, संदीप सुसर, राजू बर्डे, सहायक फौजदार दिलीप पवार, गजानन दांडगे आदी तपास करीत आहेत.
पूजाच्या पतीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले असता सोयगावच्या न्यायालयाने त्याची हर्सलला रवानगी करण्यात आली आहे.