कर्जबाजारीपणा, नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

जळगाव : सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळवून एका तरुण शेतकऱ्याने फवारणीचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यास रुग्णलयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला . समाधान एकनाथ धनगर (वय ४० रा. कंडारी ता. जळगाव) असे या शेतकऱ्याचे नाव होते. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, समाधान धनगर हा आपल्या कुटुंबासह कंडारी गावात राहत होता. तो शेतीवर आपला व कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत होता. मागील काही वर्षापासून शेतात झालेल्या नापिकी व कर्जबाजारी मुळे समाधान हा सतत चिंताग्रस्त राहत असे.

रविवारी २५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता त्याने कर्जबाजारीपणा व नापिकिला कंटाळून आपल्या राहत्या घरात पिकांवरील फवारणीचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी त्याची प्रकृती खालावली. त्याला नातेवाईकांनी एका खासगी वाहनातून जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णलयात उपचारार्थ दाखल केले. त्याच्यावर उपचार करीत असतांना २५ रोजी रात्री ९ वाजता त्यांची प्राणज्योत विझली. याबाबत जळगाव शहर पोलिसांत

पिकांवर फावरणीसाठी लागणारे विषारी औषध सेवन केले. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली. नातेवाईकांनी त्याला तातडीने खासगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना 25 च्या रात्री नऊ वाजेला त्याचा मृत्यू झाला. जळगाव शहर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई कमलबाई, दोन भाऊ, पत्नी रेखाबाई, मुलं भैय्या आणि गोलू असा परिवार आहे.